Coronavirus :कोरोनाबाधिताला एका दिवसात, तर फुप्फुसात ९९ टक्के संसर्ग झालेल्या रुग्णाला दोन दिवसांत बरे केल्याचा दावा, डॉक्टरवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 05:43 PM2021-05-08T17:43:44+5:302021-05-08T18:52:21+5:30

Coronavirus in Maharashtra : कोरोनाकाळात भीतीमुळे गोंधळून गेलेल्या लोकांची दिशाभूल करण्याचे प्रकारही घडत आहेत. अशीच कोरोनावरील उपचारांबाबत दिशाभूल करणाऱ्या एका खासगी डॉक्टराविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Coronavirus: A charged has been registered by the police against a doctor who claimed to cure a corona patient in one day in Vangani | Coronavirus :कोरोनाबाधिताला एका दिवसात, तर फुप्फुसात ९९ टक्के संसर्ग झालेल्या रुग्णाला दोन दिवसांत बरे केल्याचा दावा, डॉक्टरवर गुन्हा

Coronavirus :कोरोनाबाधिताला एका दिवसात, तर फुप्फुसात ९९ टक्के संसर्ग झालेल्या रुग्णाला दोन दिवसांत बरे केल्याचा दावा, डॉक्टरवर गुन्हा

Next

वांगणी - कोरोनाचा फैलावा वाढू लागल्यापासून सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी तसेच कोरोनाचा संसर्ग झाल्यास लवकर कोरोनामुक्त होण्यासाठी लोकांकडून वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला जात आहे. (Coronavirus in Maharashtra )  दरम्यान, कोरोनाकाळात भीतीमुळे गोंधळून गेलेल्या लोकांची दिशाभूल करण्याचे प्रकारही घडत आहेत. अशीच कोरोनावरील उपचारांबाबत दिशाभूल करणाऱ्या एका खासगी डॉक्टराविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (charged has been registered by the police against a doctor who claimed to cure a corona patient in one day in Vangani )

ठाणे जिल्ह्यातील वांगणी येथील एका डॉक्टरने कोरोनाबाधित रुग्णांना एका दिवसात बरे करण्याचा तसेच फुप्फुसामध्ये ९९ टक्के संसर्ग झालेल्या रुग्णाला दोन दिवसांत बरे करण्याचा दावा केला होता. संबंधित डॉक्टराने यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानंतर या डॉक्टरच्या रुग्णालयात रुग्णांची गर्दी होऊ लागली होती. मात्र या दाव्यावर तज्ज्ञांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. दरम्यान, ही बाब उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती.

मिळालेल्या वृत्तानुसार वांगणी येथील शीला क्लिनिक या रुग्णालयामधील डॉ. उमाशंकर गुप्ता आणि त्यांच्या डॉक्टर महिला सहकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. गुप्ता यांनी जिल्हा परिषद तसेच आरोग्य विभागाची कुठलीही परवानगी न देता कोरोनावरील उपचार सुरू केले होते. तसेच ते कोरोनासंबंधीचे कुठलेही नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 वांगणीतील डॉक्टर उमाशंकर गुप्ता गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करत होता. होमिओपॅथी पद्धतीने उपचार करत असल्याचे सांगत तो रुग्णांवर वांगणीत उपचार करत होता. याबाबत त्याने दोन दिवसात रुग्ण बरे केल्याचे दावे करणारे काही व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केले होते. या व्हिडिओची दखल घेत अंबरनाथचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील बनसोडे यांनी बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात डॉक्टर उमाशंकर गुप्ता यांच्याविरोधात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी उमाशंकर गुप्ता यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. परवानगीशिवाय कोरोना रुग्णांवर उपचार करणे, तसेच मास्क घालायला मज्जाव करणे, असे गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत. 

 गुप्ता हे वांगणी मध्ये एका दहा बाय वीस च्या खोलीमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यांच्या उपचारांमुळे अनेकांचे जीव वाचलाचा दावा होत असल्याने राज्यातून आणि परराज्यातून देखील रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत होते. मात्र कोरोणा रुग्णांवर उपचार करताना जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून योग्य ती परवानगी घेणे गरजेचे होते. मात्र गुप्ता यांनी कोणतीही परवानगी न घेता कोरोना रुग्णांवर उपचार सुरू केला होता. गुप्ता हे कोरोणा रुग्णांना दोन दिवसात बरे करीत असल्याचा दावा अनेक जण करत असले तरी त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी मात्र कोणीही पुढे येत नव्हते. त्यामुळे त्यांच्या उपचाराची नेमके पद्धत कोणती हे अद्यापही गुलदस्त्यातच राहिले आहे, तर दुसरीकडे गुप्ता यांना रोखण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

Web Title: Coronavirus: A charged has been registered by the police against a doctor who claimed to cure a corona patient in one day in Vangani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.