Coronavirus : मुंबईत आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 13:35 IST2021-04-12T13:35:33+5:302021-04-12T13:35:56+5:30

Coronavirus : तिथे उपचार सुरु असतानाच पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनामुळे आतापर्यंत १०१ पोलिसांचं निधन झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Coronavirus: Another police officer dies in Mumbai due to corona | Coronavirus : मुंबईत आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

Coronavirus : मुंबईत आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

ठळक मुद्देवाकोला पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोहन दगडे यांना करोनाची लागण झाली होती.

मुंबईत पोलीस अधिकाऱ्याचे कोरोनामुळे निधन झालं आहे. वाकोला पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या मोहन दगडे यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते ५४ वर्षांचे होते. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना बीकेसीमधील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचार सुरु असतानाच पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनामुळे आतापर्यंत १०१ पोलिसांचं निधन झाल्याची माहिती मुंबईपोलिसांनी दिली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकोला पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोहन दगडे यांना करोनाची लागण झाली होती. त्यांनी बीकेसीमधील जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती खालवल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होते. मात्र ,पहाटे ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई पोलीस दल कोरोनाच्या शिरकावामुळे हादरून गेलं आहे. मुंबईत सध्या ७७ हजार ४९५ सक्रिय रुग्ण आहेत. चिंताजनक बाब अशी की रुग्ण संख्येसोबतच मृत्यूंचाही आकडा वाढताना दिसतो आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Web Title: Coronavirus: Another police officer dies in Mumbai due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.