शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : 'कोरोना पॉझिटिव्ह' ची तपासणी करणाऱ्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 19:05 IST

नगरसेविकेच्या पतीसह पुतण्याला अटक

ठळक मुद्देखडकी पोलीस ठाण्यात मारहाण प्रकरणी ६ जणांवर गुन्हा 

 रेंजहिलमधील घटनेत ६ जणांवर गुन्हा पुणे : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबियांची तपासणी करण्यासाठी घरी आलेल्या खडकी बोर्डाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यालाच शिवीगाळ करुन मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी नगरसेविकेच्या पतीसह पुतण्याला अटक केली आहे. कैलास डेमाजी पहिलवान (वय ५०) आणि किरण शंकर पहिलवान (वय ४०, दोघेही निता अपार्टमेंट, खडकी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी डॉ. शाहीन कुजंयप्पन चारतामकुढत (वय ४९, रा. आॅर्डिनन्स इस्टेट) यांनी फिर्याद दिली आहे.  सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल पोलिसांनी तीन महिलांसह ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे़ ही घटना रेंजहिल इस्टेट परिसरात बुधवारी सकाळी साडेदहा वाजता घडली.  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शाहीन हे खडकीतील आॅर्डिनन्स फॅक्टरी हॉस्पिटलमध्ये मुख्य अधिकारी आहेत. ते हॉस्पिटलमधील सहकाऱ्यांसह बुधवारी सकाळी रेंजहिल इस्टेट परिसरात सर्व्हे व कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची तपासणी करण्यासाठी गेले होते.  यावेळी पॉझिटिव्ह रुग्णाच्या नातेवाईकांनी त्या भागातील नगरसेविकेचे पती व पुतण्याला बोलावून घेतले. आरोपींनी डॉक्टरांना तुम्ही कोरोना पेशंटला हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेत नाहीत. माझ्या वडिलांना काल तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात पाठविले. मग सर्व्हे करायला कशाला येता म्हणून असे म्हणून डॉक्टर व त्यांच्या सहकाºयांना शिवीगाळ केली. त्यानंतर डॉ़ शाहीन यांना हाताने मारहाण केली. डॉक्टर व त्यांचे सहकारी हॉस्पिटलकडे निघाले असताना आरोपींनी त्यांचा रस्ता अडवून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.पिंपरीच्या हॉस्पिटलमध्ये नगरसेवकाने गोंधळ घातल्याचा प्रकार ताजा असताना खडकीमधील हा प्रकार समोर आला आहे़ खडकी पोलिसांनी नगरसेविकेच्या पती व पुतण्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस