शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

कोरोना नियम तर डावललेच पण लग्नातील वधूही निघाली अल्पवयीन; बालविवाहाची झाली पोलखोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 7:46 PM

Child Marriage : बालविवाह प्रकरणात सहा जणांवर गुन्हा दाखल

ठळक मुद्देखंडाळात कारवाई : रोखायला गेले कोरोना, सापडला बालविवाह

यवतमाळ: दुर्गम ठिकाणी एका मंदिरात कोरोनाचे नियम डावलून लग्न लावले जात आहे, अशी गुप्त खबर प्रशासनाला मिळाली. त्यावरून कारवाईसाठी धडकलेल्या अधिकाऱ्यांपुढे भलताच प्रकार आला. कोरोनाचे नियम तर डावलले गेलेच, पण लग्नातील नवरी मुलगीही अल्पवयीन निघाली. त्यामुळे या प्रकरणात गर्दी करणे व अल्पवयीन मुलीचा विवाह लावणे आदी बाबीसंदर्भात सहा जणांवर खंडाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमा भागात मंगळवारी हा प्रकार घडला. पांढुर्णा गावातील एका मंदिरात बालविवाह होत असल्याची माहिती हिंगोली जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली. त्या आधारे त्यांचे अधिकारी व हिंगोली पोलीस यांनी विवाहस्थळ गाठले. मात्र तोपर्यंत विवाह संपन्न झाला. घटना यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीत घडल्याने पुसद तालुक्यातील खंडाळा पोलिसांना माहिती देण्यात आली. यवतमाळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांच्या मार्गदर्शनात खंडाळाचे ठाणेदार गोपाल चावडीकर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर घटनास्थळी पोहोचले. ग्रामसेवक पांडुरंग बुरकुले यांनी फिर्याद दिल्यानंतर यात ३० वर्षीय नवरदेव, लग्न जुळविणारे व लग्न लावून देणारे अशा व्यक्तींवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच कोरोना काळात गर्दी जमविल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईसाठी यवतमाळ बाल संरक्षण कक्षाचे महेश हळदे, माधुरी पावडे, सुनिल बोकसे, हिंगोली येथील बालसंरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :marriageलग्नYavatmalयवतमाळcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस