CoronaVirus : कोरोना पॉझिटिव्ह तरुण मित्राच्या हळद, लग्नामध्ये आला; विवाह सोहळा आयोजकांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 04:25 PM2020-03-29T16:25:12+5:302020-03-29T16:39:24+5:30

CoronaVirus : ठाणे जिल्यातील अशा स्वरूपाचा पहिलाच गुन्हा आहे.  

Corona positive came to the marriage of friend; case registered on wedding ceremony organizer pda | CoronaVirus : कोरोना पॉझिटिव्ह तरुण मित्राच्या हळद, लग्नामध्ये आला; विवाह सोहळा आयोजकांवर गुन्हा

CoronaVirus : कोरोना पॉझिटिव्ह तरुण मित्राच्या हळद, लग्नामध्ये आला; विवाह सोहळा आयोजकांवर गुन्हा

Next
ठळक मुद्दे या हळद आणि लग्न सोहळ्याला परदेशातून आलेला एक तरुण सहभागी झाला होता. याबाबत रामनगर आणि विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गुन्हे दाखल

डोंबिवली - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ मार्चपासून राज्य सरकारने सार्वजनिक कार्यक्रम आयोजनावर बंदी घातली होती. तरी देखील सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवत १८ व १९ मार्चला डोंबिवली पश्चिमेला हळद आणि लग्न सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा ठाणे जिल्यातील अशा स्वरूपाचा पहिलाच गुन्हा आहे.
 
या हळद आणि लग्न सोहळ्याला परदेशातून आलेला एक तरुण सहभागी झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्या तरुणामुळे हळदी व लग्न समारंभाला आलेल्यांना कोरोनाची लागण झाली असावी. समारंभासाठी नेमके किती लोक होते. याची पोलीस माहिती घेत असून लग्न व हळदी कार्यक्रमा आयोजन करणाऱ्यांवर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.


याबाबत रामनगर आणि विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आहेर यांनी दिली हळदी समारंभ १८ मार्च तर १९ मार्च रोजी लग्न झाले होते. या दोन्ही कार्याला मोठ्या प्रमाणात एका समाजाचे नागरिक हजर होते. या सगळ्यांची चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप राऊत यांनी सांगितले.

Web Title: Corona positive came to the marriage of friend; case registered on wedding ceremony organizer pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.