Coronavirus : खळबळ माजली! कोरोना पॉझिटिव्ह आरोपी कोविड सेंटरमधून पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 15:08 IST2020-09-08T15:08:08+5:302020-09-08T15:08:41+5:30
Coronavirus : कोरोना पाॅझिटिव्ह असल्याने कोविड केअर सेंटरमध्ये होता दाखल

Coronavirus : खळबळ माजली! कोरोना पॉझिटिव्ह आरोपी कोविड सेंटरमधून पसार
साकोली (भंडारा) : चोरीच्या प्रकरणात साकोली पोलिसांनी अटक केलेला आरोपी कोविड केअर सेंटरमधून पसार झाल्याची घटना उघडकीस आली. अटक केल्यानंतर तपासणीत त्याच्यासह चार आरोपी पाॅझिटिव्ह आले होते. पोलीस पसार चोरट्याचा शोध घेत आहे.
मोटरसायकल चोरीच्या प्रकरणात साकोली पोलिसांनी तुमसर तालुक्यातील चौघांना गत आठवड्यात अटक केली होती. त्यांना न्यायालयाने चार दिवसाची कोठडी सुनावली होती. त्यांची कोरोना चाचणी केली असता पाॅझिटिव्ह आली. त्यामुळे चौघांनाही साकोली येथील तंत्रनिकेतनमधील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान एक आरोपी येथून पसार झाल्याचे सोमवारी सायंकाळी पुढे आले. पोलिसांनी ही बाब गोपनीय ठेवत शोध सुरु केला. मात्र चोरटा हाती लागला नाही. ही माहिती मंगळवारी पुढे आली. ठाणेदार मनोज सिडाम यांना याबाबत विचारना केली असता त्यांनी दुजोरा दिला. आरोपीचा शोध सुरु असल्याचे सांगितले. कोरोना पाॅझिटिव्ह आरोपी पसार झाल्यानंतर अनेकांच्या संपर्कात येण्याची शक्यता असल्याने पोलिसांसह प्रशासनाचेही धाबे दणाणले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार
मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन
वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!
खळबळजनक! पोलिसांसमोरच हत्येच्या आरोपीची जमावाने मरेपर्यंत केली मारहाण
रियाने केला मोठा खुलासा, २५ बॉलिवूड सेलिब्रिटींना NCB चौकशीसाठी बोलावण्याचा तयारीत