Coronavirus : कोरोना रुग्णाच्या जीवाशी खेळ! १० हजार बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त; चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 21:01 IST2021-04-23T21:01:12+5:302021-04-23T21:01:38+5:30
Coronavirus : Fake Remdesivir Injections - पोलिसांनी कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Coronavirus : कोरोना रुग्णाच्या जीवाशी खेळ! १० हजार बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त; चौघांना अटक
रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळ्या बाजाराविरूद्ध उत्तर प्रदेशात पोलिस मोहीम सुरू आहे. लखनौच्या अमीनाबाद येथून पोलिसांनी 10 हजार बनावट रेमेडिसिव्हिर इंजेक्शन्स जप्त केली आहेत. यासह चार जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
दरम्यान, उत्तर प्रदेशात कोरोनासह परिस्थिती गंभीर होत आहे. राज्याची राजधानी लखनौ एक प्रकारे केंद्रबिंदू बनत आहे. एकीकडे लखनौमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सतत वाढत आहे, दुसरीकडे सरकारकडून कोरोना रोखण्यासाठी लसीकरण अभियानही संथ गतीने सुरू झाले आहे. गेल्या एका आठवड्यातील आकडेवारी पाहिल्यास लखनौमध्ये लसीकरणाचा वेग कमी झाला आहे. १९ एप्रिलमध्ये लखनौमधील 44 शासकीय रुग्णालये आणि अनेक खासगी केंद्रांवर कोरोना लसीचा लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये एकूण ५२२९ लाभार्थ्यांनी लस घेतली.
यामध्ये शासकीय रूग्णालयात 3863 आणि खाजगी रुग्णालयातील केंद्रामध्ये 1366 लोकांना लसी देण्यात आली. विशेष म्हणजे त्यांच्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक होती आणि एकूण 2104 लोकांना लसचा दुसरा डोस मिळाला, तर केवळ 607 लोकांना प्रथम डोस मिळाला.
तसेच 20 एप्रिल रोजी 130 रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली. येथे ७२ सरकारी रुग्णालये आणि ५८ खासगी रुग्णालये होती. येथे एकूण 6033 लोकांना लस देण्यात आली. दुसर्या दिवशी २१ एप्रिल रोजी १२९ रुग्णालयात लसीकरण सत्र घेण्यात आले. 14 सरकारी आणि 55 खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 4913 लोकांना लसी देण्यात आल्या. या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, कोरोना संसर्गाचा आलेख जसजसा वाढत आहे. तसतसे हॉस्पिटलकडे जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. संभाषणादरम्यान लोकांकडून मिळालेली माहिती बर्यापैकी आश्चर्यचकित करणारी होती. लोकांना असं वाटतं की, लस घेतल्यानंतर जर ताप आला किंवा आणखी वाईट झाले तर मग त्यांनी उपचार कोठे घ्यायचे अशी भीती लोकांच्या मनात आहे.