५ लग्न, मर्डर मिस्ट्री अन् काँग्रेस कनेक्शन, ४८ दिवसांनी रहस्य उलगडलं; ‘खूनी पोलीस’चा डाव फसला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 10:45 AM2021-07-28T10:45:47+5:302021-07-28T10:49:47+5:30

अजय देसाईनं स्वीटीसोबत २०१६ मध्ये प्रेमविवाह केला होता. परंतु त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला.

Cop killed his lover to avoid Rs 25 lakh alimony in Gujarat | ५ लग्न, मर्डर मिस्ट्री अन् काँग्रेस कनेक्शन, ४८ दिवसांनी रहस्य उलगडलं; ‘खूनी पोलीस’चा डाव फसला

५ लग्न, मर्डर मिस्ट्री अन् काँग्रेस कनेक्शन, ४८ दिवसांनी रहस्य उलगडलं; ‘खूनी पोलीस’चा डाव फसला

googlenewsNext
ठळक मुद्दे५ जूनपासून स्वीटीचा शोध सुरू होता तो शेवटपर्यंत पोहचला ज्याचा विचारही कुणी केला नसेलस्वीटी बेपत्ता होण्यापूर्वी अजय आणि स्वीटीमध्ये भांडण झाल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे अजयची चौकशी होणारच होती.अजय स्वत: स्वीटीचा शोध घेत होता परंतु त्याने बायको बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिलीच नव्हतीपोलिसांनी अजयचा तपास सुरू केला तेव्हा तो स्वीटीबाबत उडवाउडवीची उत्तरं देत होता

अहमदाबाद – गुजरातमध्ये राहणाऱ्या एका महिलेने अमेरिकेत राहणाऱ्या एका NRI सोबत लग्न केले. परंतु काहीच दिवसांनी त्यांनी तलाक घेतला त्यानंतर ही महिला गुजरातला परतली. तेव्हा तिची भेट गुजरातमधील पोलीस निरीक्षकासोबत झाली. दोघांमध्ये जवळीक वाढली त्यानंतर एकेदिवशी दोघांनी कुणालाही खबर न लागता एका मंदिरात लग्न केले. मात्र ही गोष्ट माहिती नसल्याने पोलिसाच्या कुटुंबाने त्याचं दुसरं लग्न ठरवलं. ही बाब पहिल्या पत्नीला कळाली. त्यानंतर ती महिला गायब झाली आणि ४८ दिवसांनी पहिल्या पत्नीचं सत्य समोर आलं.

५ जून २०२१ रोजी स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे पोलीस निरीक्षक अजय देसाईने(Ajay Desai) सकाळी सकाळी त्याच्या सासरी फोन केला. त्याने सांगितले की, रात्री माझं बायकोसोबत भांडण झालं सकाळी ती कुणालाही न सांगता घर सोडून निघून गेली. त्यामुळे मी चिंतेत आहे. त्यानंतर सासरची मंडळी तातडीनं देसाईच्या घरी पोहचली. तेव्हा अजय देसाई स्वत: कार घेऊन बायकोला शोधण्यासाठी जात असल्याचं सांगत घरातून बाहेर पडला.

अजय देसाईनं स्वीटीसोबत २०१६ मध्ये प्रेमविवाह केला होता. परंतु त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. परंतु कहानीमध्ये ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा घटस्फोटानंतरही अजय आणि स्वीटी लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. याच काळात  ४ आणि ५ जूनला स्वीटी आणि अजयमध्ये भांडण झालं. त्यानंतर स्वीटी गायब झाली तिचा काहीही थांगपत्ता लागला नाही. या दोघांना २ वर्षाचा मुलगाही आहे. अजय स्वत: पोलीस आहे त्यामुळे पत्नी स्वीटीला शोधण्याची जबाबदारी अजयनं घेतली. त्यानंतर सासरीची मंडळी २ वर्षाच्या मुलाला घेऊन त्यांच्या घरी गेली.

परंतु ५ जूनपासून स्वीटीचा शोध सुरू होता तो शेवटपर्यंत पोहचला ज्याचा विचारही कुणी केला नसेल. ५ जूनला स्वीटी बेपत्ता झाली त्यानंतर अजय तिचा शोध घेत होता. परंतु खूप प्रयत्नानंतरही तिचा ठावठिकाणा लागला नाही. स्वीटी बेपत्ता असल्यानं घरच्यांचंही टेन्शन वाढलं. अजय स्वत: स्वीटीचा शोध घेत होता परंतु त्याने बायको बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिलीच नव्हती. बरेच आठवडे झाले तरीही शोध लागत नव्हता. म्हणून स्वीटीचा भाऊ जयदीप पटेलने ११ जूनला करजन पोलीस ठाण्यात बहिण बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

स्वीटी बेपत्ता होण्यापूर्वी अजय आणि स्वीटीमध्ये भांडण झाल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे अजयची चौकशी होणारच होती. पोलिसांनी अजयचा तपास सुरू केला तेव्हा तो स्वीटीबाबत उडवाउडवीची उत्तरं देत होता. तर स्वीटीच्या घरच्यांनी अजयवर संशय व्यक्त करायला सुरुवात केली. पोलिसांनी ४ आणि ५ जून रोजी अजयनं त्याचा मित्र आणि काँग्रेस नेता किरीट सिंह जडेजाला फोन केला हा आणि दुसऱ्या दिवशी त्याची भेट घेतली. जडेजासोबत भेट का घेतली याचा शोध पोलिसांनी घेतला.

पोलीस करजनमध्ये असलेल्या जडेजाच्या त्या हॉटेलपर्यंत पोहचली जिथं अजयनं त्याची भेट घेतली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. १ जून ते १० जूनपर्यंत फुटेज तपासले परंतु ५ जून सकाळचे फुटेज डिलिट करण्यात आले होते. तेव्हा पोलिसांना आणखी संशय वाढला. त्यानंतर पोलिसांनी अजय देसाईसोबतच त्याचा मित्र किरिट सिंह जडेजावर पाळत ठेवली. क्राईम ब्रान्चनं अजय देसाईची पॉलीग्राफ टेस्ट घेतली यात काही संकेत मिळाले. मात्र अजय वारंवार बायकोच्या बेपत्ता होण्यामागे त्याला काहीच माहिती नाही असं दाखवत होता.

पोलिसांनी अजयच्या मोबाईल फोनचा तपास घेतला. तेव्हा ५ जूनला दुपारी अजय करजनपासून ५० किमी अंतरावर भरुच जिल्ह्यातील अटाली गावात होता. त्याठिकाणी तो २ तास थांबला. योगायोग म्हणजे याठिकाणी काँग्रेस किरीट जडेजाच्या एका हॉटेलचं बांधकाम सुरू आहे. त्यामुळे अटाली गावापर्यंत पोलीस पोहचले. त्याठिकाणी जडेजाचं हॉटेल होतं तेथे तपास सुरू केला. तेव्हा त्यांना काही खूणा आणि हाडे सापडली. त्यामुळे संशय आणखी बळावला. त्यानंतर एक पथक अजय देसाईच्या घरी पोहचलं तेव्हा त्यांना आणखी एक पुरावा सापडला. अजयच्या घरातील बाथरूममध्ये रक्ताचे डाग होते. ज्याच्या तपासातून अजयनेच बायकोची हत्या केल्याचं उघड झालं.

अजयनं का केला बायकोचा खून?

अजयनं त्याच्या बायकोची हत्या का केली हा प्रश्न पोलिसांना पडला होता. तेव्हा खुलासा झाला की, अजय देसाईनं स्वीटीसोबत २०१६ मध्ये लग्न केले होते. स्वीटीने याआधीच २ लग्न केली होती तिने घटस्फोटही घेतले होते. २०१५ मध्ये तिने अमेरिकेत राहणाऱ्या तिच्या दुसऱ्या नवऱ्यासोबत घटस्फोट घेऊन भारतात परतली. भारतात आल्यानंतर तिची भेट अजय देसाईसोबत झाली. दोघांनी लग्न केले.

अजयचंही हे दुसरं लग्न होतं. त्याने पहिल्या लग्नानंतर बायकोला घटस्फोट दिला. स्वीटी आणि अजय २ वर्ष सुखाने नांदत होते. त्यांना २ वर्षाचा मुलगाही होता. परंतु अजयच्या आयुष्यात तिसऱ्या मुलीची एन्ट्री झाली. त्यानंतर अजयनं स्वीटीसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. परंतु घटस्फोट घेतल्यानंतरही दोघं लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. तिसऱ्या पत्नीसोबत जवळीक वाढल्याने स्वीटीसोबत त्याची रोज भांडण होत होती. एकेदिवशी हे भांडण इतकं टोकाला पोहचलं की अजयने ४ जूनला स्वीटीची हत्या केली.

Web Title: Cop killed his lover to avoid Rs 25 lakh alimony in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.