पिंपरीत क्रिकेट खेळण्यावरून वाद; स्टम्प, बॅटने केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 14:31 IST2019-10-05T14:23:56+5:302019-10-05T14:31:56+5:30

फिर्यादी चौधरी त्यांच्या मित्रांसोबत गुरुवारी सायंकाळी यशवंतनगर येथे क्रिकेट खेळत होते...

Controversy over playing cricket; Stump, bat hit | पिंपरीत क्रिकेट खेळण्यावरून वाद; स्टम्प, बॅटने केली मारहाण

पिंपरीत क्रिकेट खेळण्यावरून वाद; स्टम्प, बॅटने केली मारहाण

पिंपरी : क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला. यात स्टम्प व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. पिंपरीतील यशवंतनगर येथे गुरुवारी (दि. ३) सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अझहर नशीबउल्ला चौधरी (वय ३४, रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रेम वाघमारे (वय २५) व त्याचे १४ साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
फिर्यादी चौधरी त्यांच्या मित्रांसोबत गुरुवारी सायंकाळी यशवंतनगर येथे क्रिकेट खेळत होते. त्यावेळी आरोपी वाघमारे तेथे दुचाकीवरून आला. फियार्दी खेळत असलेल्या ठिकाणाहून त्याने दुचाकी नेली. त्यावेळी त्याने फिर्यादीच्या मेव्हण्यास शिवीगाळ करून 'तुम्ही लोक ग्राऊंडवर जाऊन खेळा, असे म्हणाला. तुला बाजूने जाता येत नाही का,ह्णह्ण असे चौधरी यांचा मेव्हणा म्हणाला. त्यानंतर आरोपी तेथे वाद घालू लागला. त्यास समजूत घातली. त्याचा राग मनात धरून आरोपी वाघमारे तेथून निघून गेला. त्यानंतर आरोपी वाघमारे त्याच्या मित्रांसह तेथे आला व बेकायदा जमाव केला. तसेच फियार्दी क्रि केट खेळत असताना तेथील स्टम्प घेऊन चौधरी व त्यांच्या मित्रांना मारून व त्यांच्या मेव्हण्यास क्रिकेटच्या बॅटने, स्टम्पने व दगडाने मारून गंभीर जखमी केले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Controversy over playing cricket; Stump, bat hit