डीजेचा आवाज कमी करण्यावरुन वाद; लहान भावाने मोठ्या भावाला कुऱ्हाडीने कापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 14:22 IST2024-03-10T14:22:24+5:302024-03-10T14:22:50+5:30
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

डीजेचा आवाज कमी करण्यावरुन वाद; लहान भावाने मोठ्या भावाला कुऱ्हाडीने कापले
MP News: मध्य प्रदेशातील सतना येथे एका कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान धक्कादायक घटना घटना घडली. कार्यक्रमात गाण्याचा आवाज कमी करण्यावरुन दोन भावांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की, लहान भावाने मोठ्या भावाची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. नंतर पोलिसांनी आरोपीला अटक केले.
मिळालेल्या माहितीनुसार, सतनातील कोठी पोलिस स्टेशन हद्दीतील मौहर गावात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. राकेश(35) याच्या घरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डीजेवर मोठ्या आवाजात गाणे सुरू होते. राकेश यांनी आवाज कमी केला, त्यामुळे त्यांचा लहान भाऊ राजकुमार(30)ने वाद घातला. हा वाद इतका वाढला की, आरोपीने मोठ्या भावावर कुऱ्हाडीचे वार केले.
हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला, पण नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्यात वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. ही हत्या फक्त गाण्याच्या आवाजामुळे झाली की, इतर काही कारण आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.