अनैतिक संबंधातून वाद? बाळेघोल येथील तरुणाचा गावठी कट्ट्यातून गोळी झाडून खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 14:48 IST2023-03-06T14:48:04+5:302023-03-06T14:48:24+5:30

घटनास्थळी चर्चा - सेनापती कापशी हद्दीत घडली घटना 

Controversy from an immoral relationship? A young man from Baleghol was shot and killed by a gunshot from Gavathi Katta | अनैतिक संबंधातून वाद? बाळेघोल येथील तरुणाचा गावठी कट्ट्यातून गोळी झाडून खून 

अनैतिक संबंधातून वाद? बाळेघोल येथील तरुणाचा गावठी कट्ट्यातून गोळी झाडून खून 

- शशिकांत भोसले 

लोकमत न्यूज नेटवर्क 
 सेनापती कापशी : बाळेघोल (ता. कागल) येथील भरत बळीराम चव्हाण  (वय ३२) या तरुणाचा अनैतिक संबंधातील वादातून   गावठी कट्ट्यातून कानशिलात गोळी झाडून खून करण्यात आला. घटनास्थळावरून  संशयीत आरोपी विकास हेमंत मोहिते ( रा.बाळेघोल, वय२५) हा थेट मुरगूड पोलिस ठाण्यात स्वतः हुन  हजर झाला.सकाळी साडे दहाच्या सुमारास सेनापती कापशी हद्दीत ही घटना घडली.

 याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,  संशयित आरोपी विकास मोहिते याचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय भरत चव्हाण याला होता. यातुनच भरत व त्याची पत्नी यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते . परिणामी चार वर्षांपूर्वी भरत चव्हाण यांने पत्नीला घटस्फोट दिला होता. तेंव्हापासून भरत चव्हाण व विकास मोहिते यांच्यामध्ये पूर्ववैमनस्यातून वारंवार खुन्नस व वाद होत होते. गेल्या तीन ते चार वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. 

 आज सकाळी भरत चव्हाण हा आपला मित्र ओंकार जाधव याच्यासोबत सेनापती कापशी हद्दीत असणार्या चिगरे पाणंद येथे विहीरीवर कामासाठी जात होता. यावेळी विकास मोहिते याने मोटारसायकल आडवी मारुन गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला.दरम्यान विकास मोहिते याने भरत याला मोटरसायकल वरुन खाली उतरवले व डाव्या कानशिलात गावठी कट्ट्यातून गोळी झाडली यामुळे  जागेवरच भरत हा रक्ताच्या थारोळ्यात पडला. यावेळी मोठा आवाज झाल्याने आजुबाजुला शेतात काम करणारे शेतकरी घटनास्थळी धावुन आले. गोळी झाडून आरोपी विकास मोहिते हा थेट मुरगूड पोलिस ठाण्यात हजर झाला. संशयित आरोपी विकास मोहिते हाही विवाहित आहे.

Web Title: Controversy from an immoral relationship? A young man from Baleghol was shot and killed by a gunshot from Gavathi Katta