शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
4
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
5
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
6
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
7
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
8
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
9
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
10
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
11
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
13
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
14
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
15
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
16
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
17
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
18
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
19
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
20
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त आयपीएस भाग्यश्री नवटकेची कणकवलीत उचलबांगडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 13:28 IST

वायरल व्हिडीओ क्लिप प्रकरण; दलित समाजाबद्दलचे अपशब्द काढणं भोवले

ठळक मुद्देराज्य गुप्त वार्ता विभागाच्या औरगांबाद येथून त्यांना कणकवलीला पाठविण्यात आले असून सोमवारी गृह विभागाकडून त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले.आगामी निवडणूकीत त्याचा फटका बसू नये, म्हणून राज्य सरकारने अखेर त्यांना दुय्यम दर्जाच्या समजल्या जाणाऱ्या कणकवली येथे उचलबांगडी करण्यात आली.

जमीर काझीमुंबई - मागासवर्गीय समाजाबद्दल आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशिक्षणार्थी महिला आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांची अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली उप विभागात उचलबांगडी करण्यात आली आहे. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या औरगांबाद येथून त्यांना कणकवलीला पाठविण्यात आले असून सोमवारी गृह विभागाकडून त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले.दरम्यान, भाग्यश्री नवटके यांची विभागीय चौकशी अद्याप पुर्ण झालेली नाही. त्याबाबतची अंतिम कारवाई अहवाल आल्यानंतर करण्यात येईल, असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. २०१७ च्या आयपीएस बॅँचच्या अधिकारी असलेल्या पर्यवेक्षणार्थी भाग्यश्री नवटके बीड जिल्ह्यातील माजलगांव येथे सहाय्यक अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. गेल्यावर्षी २ डिसेंबरला त्यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. त्यामध्ये कार्यालयात आलेल्या ४ - ५  जणांच्या व्यक्तीशी बोलताना ‘मी तुम्हाला खुपच कमी मारले आहे, दलित समाजातील तरुणांना किती बेदम मारहाण करते याची कल्पना नाही. मालेगावमधील मुस्लिम तरुणांनाही हिसका दाखविला आहे. त्यांचे हात व पाय फोडून काढले आहेत, त्यांना माझ्या कार्यालयात थांबवूनही घेत नाही, अट्रोसिटीच्या गुन्हे दाखल करण्यासाठी येणाऱ्यांना हाकलून लावते, मला युपीएससीत १२५ रॅँक मिळूनही खूल्या गटातील असल्याने आयपीएसला निवड झाली. मात्र ६०० रॅँक मिळविणाऱ्यांना आयएसएची पोस्टीग मिळाली, असे वक्तव्य त्यामध्ये करण्यात आले होते. सोशल मिडीयावरुन हा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरावरुन टीकेची झोड उठली होती. दलित व मुस्लिम समाजाला ‘टार्गेट’ करण्याच्या तिच्या वक्तव्यामुळे राज्य सरकारची बदनामी होत असल्याने त्यांची तातडीने गुप्त वार्ता विभागाच्या औरंगाबाद येथे बदली करण्यात आली. मात्र त्यामुळे त्यांच्या वर्तनावर फारसा फरक पडला नसल्याची चर्चा दलित समाजाकडून करण्यात येत होती. आगामी निवडणूकीत त्याचा फटका बसू नये, म्हणून राज्य सरकारने अखेर त्यांना दुय्यम दर्जाच्या समजल्या जाणाऱ्या कणकवली येथे उचलबांगडी करण्यात आली.नाशिक आयजीकडून चौकशी सुरुव्हिडीओ क्लिपमध्ये भाग्यश्री नवटके या दलित व मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे त्यांना तातडीने बीड येथून एसआयडीला हलविण्यात आले. त्याचबरोबर या प्रकरणाची चौकशी नाशिक परिश्रेत्राचे विशेष महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्याकडून चौकशीचा अद्याप अहवाल आला नसल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.पाच सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यावादग्रस्त अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्याबरोबरच गृह विभागाने सोमवारी पाच सहाय्यक आयुक्त/ उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यांची नावे अशी (कंसात कोठून - कोठे) : विजयकुमार पळसुले (नक्षल विरोधी अभियान, नागपूर- गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे), रविंद्र गिड्डे (बदली आदेशाधीन माणगांव- नवी मुंबई), पोपट दडस ( एसआरपी,जलना- एसआरपी,दौंड), मोहम्मद युनुस काद्री ( एसआरपी नागपूर-एसआरपी पुणे), अनिल भोपे (वायरलेस विभाग, नागपूर- प्रशिक्षण केंद्र, पुणे)

 

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रKankavliकणकवलीSocial Viralसोशल व्हायरल