शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

बॉलीवूडचा चित्रपट पाहून रचला हत्येचा कट, वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून केले अपहरण आणि नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 22:29 IST

Murder Case :अपहरण झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी दोन आरोपींना अटक करताना बुरारी येथून मृतदेह ताब्यात घेतला.   

ब्लाइंड मर्डरचे गूढ उलगडत दिल्ली पोलिसांनी दोन आरोपींना तुरुंगात टाकले असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. हा खळबळजनक खुलासा करताना पोलिसांनी सांगितले की, एका 18 वर्षीय मुलाला वाढदिवसाच्या पार्टीत बोलावून त्याचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. वास्तविक आरोपी मुलाची हत्या केल्यानंतर खंडणी मागण्याचा प्रयत्न करत होते. मात्र याच दरम्यान अपहरण झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी दोन आरोपींना अटक करताना बुरारी येथून मृतदेह ताब्यात घेतला.

  मित्रांनी 18 वर्षाच्या मुलाची हत्या केली

मित्र गोपालसोबत वाढदिवसाच्या पार्टीला जात असल्याचे घरच्यांना सांगून रोहन घरातून निघून गेला होता. त्यानंतर तो परतलाच नाही. त्यानंतर 23 जानेवारी रोजी रात्री 11.30 च्या सुमारास दिल्ली पोलिसांना बातमी मिळाली की, रोहन नावाचा 18 वर्षांचा मुलगा बुरारी येथून बेपत्ता झाला आहे. बेपत्ता व्यक्तीची नोंद करताना पोलिसांनी उपनिरीक्षक दीपक शर्मा तपस करत होते.रोहनचे वडील व्यापारी आहेत आणि त्यांचा मुलगा दिल्लीतील कॉन्व्हेंट शाळेत इयत्ता अकरावीत शिकत होता. पोलिसांनी प्रथम रोहनचा मोबाईल ट्रॅक करण्यास सुरुवात केली, त्यानंतर उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील रोहनच्या मोबाईलचे लोकेशन सापडले. पोलिसांच्या पथकाने रोहनच्या घरातील अनेक भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. पोलिसांनी परिसरातील 200 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची छाननी केली.खंडणीच्या मागणीसाठी रोहनची हत्या करण्यात आली होतीरोहनच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले होते की, तो गोपाल नावाच्या मुलासोबत गेला होता. त्यानंतर पोलिसांनी गोपालला ट्रक करून पकडले. गोपालने चौकशीदरम्यान सांगितले की, तो एका प्रसिद्ध शोरूममध्ये क्लिनर म्हणून काम करतो. ज्यामध्ये त्याला 8 हजार पगार मिळतो आणि रोहन त्याच्या वडिलांसोबत त्या शोरूममध्ये यायचा. त्यामुळे दोघांची मैत्री झाली. यादरम्यान गोपालने किडनॅपिंग फिल्म पाहिली आणि रोहनचे अपहरण करण्याची कल्पना त्याच्या मनात आली. रोहनने त्याच्या दोन मित्रांनाही कटात सामील केले. रोहनला वाढदिवसाच्या पार्टीत बोलावून त्याचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागायची, जी खंडणी सहज उपलब्ध होईल, असा त्यांचा कट होता.पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीकटानुसार 16 जानेवारी रोजी गोपालने एक खोली भाड्याने घेतली आणि 23 जानेवारी 2022 रोजी मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला जाण्यासाठी गोपालने रोहनला सोबत नेले. मात्र पार्टी नसून जीवावर बेतणारे षडयंत्र रोहनची वाट पाहत होते, त्यानंतर तिघांनी मिळून रोहनचे हात-पाय बांधले, या हाणामारीत आरोपींनी रोहनचा दोरीने गळा आवळून खून केला. आता त्याने रोहनच्या कुटुंबीयांना फोन करून खंडणी मागण्याचा विचार केला.24 जानेवारीला गोपाल त्याच्या कामानिमित्त शोरूममध्ये गेला असता त्याला कळलं की, पोलीस रोहनचा शोध घेत आहेत. त्यामुळे या सर्व लोकांनी रोहनच्या कुटुंबीयांकडून खंडणी मागण्याचा बेत सोडून दिला. गोपालच्या एका साथीदाराने रोहनचा मोबाईल घेऊन मुरादाबादला जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहिला. त्यामुळेच रोहनचे मोबाईल लोकेशन पोलिसांना मुरादाबादमध्ये सापडले.तिसऱ्या आरोपीला पकडण्यासाठी छापेमारी सुरू आहे.आरोपी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी गोपालचा मित्र सुशील यालाही अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी रोहनचा मृतदेहही ताब्यात घेतला. तिसऱ्या आरोपीच्या शोधात पोलीस छापेमारी करत आहेत. लवकरच तिसऱ्या आरोपीलाही अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणDeathमृत्यूPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशArrestअटक