हुंड्यासाठी काँग्रेसच्या नेत्याने मुलासह सुनेवर केला तलवारीने जीवघेणा हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 20:43 IST2020-03-18T20:42:09+5:302020-03-18T20:43:54+5:30

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Congress leader attacked on son and daughter in law with sword pda | हुंड्यासाठी काँग्रेसच्या नेत्याने मुलासह सुनेवर केला तलवारीने जीवघेणा हल्ला 

हुंड्यासाठी काँग्रेसच्या नेत्याने मुलासह सुनेवर केला तलवारीने जीवघेणा हल्ला 

ठळक मुद्देकाँग्रेसचे प्रदेश महासचिव यांनी हा हल्ला केल्याचा आरोप आहे. सध्या दोन्ही जखमींना गुरुग्राम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पीडित सुनेची प्रकृती अत्यंत नाजूक असून मुलाचे हात कापल्याचे सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली - गुरुग्राममधील सोहनास्थित रिठौज या गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रिठौज या गावात काँग्रेसचा नेता असलेल्या वडिलांनी तलवारीने आपल्या मुलावर व सुनेवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा आणि सून दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात सुनेची प्रकृती चिंताजनक आहे. काँग्रेसचे प्रदेश महासचिव यांनी हा हल्ला केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सध्या दोन्ही जखमींना गुरुग्राम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडित सुनेची प्रकृती अत्यंत नाजूक असून मुलाचे हात कापल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सुनेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, महिलेची प्रकृती चिंताजनक असून त्यांची प्रकृती सुधारल्यास पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षाची पर्वा न करता आरोपीवर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Congress leader attacked on son and daughter in law with sword pda