Complaint against musician Ajay-Atul, parody of Anna Bhau Sathe's song | संगीतकार अजय-अतुल यांच्याविरूद्ध तक्रार, अण्णा भाऊ साठे यांच्या गीताचे विडंबन

संगीतकार अजय-अतुल यांच्याविरूद्ध तक्रार, अण्णा भाऊ साठे यांच्या गीताचे विडंबन

परभणी : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या गीतातील मूळ रचनेत बदल करून चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करून भावना दुखावल्याप्रकरणी संगीतकार, गायक अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांच्याविरुद्ध शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. परभणी येथील लालसेनेचे प्रमुख गणपत भिसे यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासंदर्भात अण्णा भाऊ साठे यांनी ‘माझी मैना गावावर राहिली माझ्या जिवाची होतीया काहिली’ ही छक्कड लिहिलेली आहे. कर्नाटकात अडकून पडलेला मराठी भाषा प्रदेश जोपर्यंत महाराष्ट्रात येत नाही, तोपर्यंत संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होणार नाही, हे सांगताना या छक्कडमध्ये अण्णा भाऊ साठे यांनी ‘बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’ असे लिहिले होते. मात्र, या  मूळ रचनेत बदल करून संगीतकार, गायक अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांनी या गीताचा संपूर्ण अर्थ बदलून टाकला आहे, असे म्हटले आहे.

Web Title: Complaint against musician Ajay-Atul, parody of Anna Bhau Sathe's song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.