डॉक्टरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 14:04 IST2019-12-23T14:03:09+5:302019-12-23T14:04:27+5:30
डॉक्टर दांपत्याविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉक्टरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
कल्याण - मूळगावी जमीन विकत घेण्यासाठी त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा वाढविण्यासाठी नवीन मशीन खरेदी केल्याने कर्ज झाल्याचा बहाणा करून १ कोटी ५२ लाखांची रक्कम घेऊन त्याबदल्यात बेसमेंटसह ४ गाळे ६ कोटीमध्ये देण्याचे आश्वासन देऊन गाळे परस्पर विकणाऱ्या डॉक्टर दांपत्याविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण पश्चिमेकडील चिकणघर येथे राहणारे यलप्पा अप्पया मनगुटकर यांनी वायले नगर येथे डॉ. हेमंत मोरे आणि त्यांच्या पत्नी मनीषा मोरे यांना मूळगावी जमीन विकत घेण्यासाठी १ कोटी ५२ लाखांची रक्कम दिली. त्याबदल्यात मोरे राहत असलेल्या बिल्डिंगमधील बेसमेंटसह ४ गाळे ६ करोडमध्ये देण्याचे आश्वसन मोरे दाम्पत्याने यलप्पा मनगुटकर यांना दिले होते. मात्र, तसे न करता मोरे दाम्पत्याने यलप्पा मनगुटकर यांचा विश्वासघात करून गाळे परस्पर विकल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा कोळसेवाडी पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे.