प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 09:38 IST2025-11-04T09:32:29+5:302025-11-04T09:38:23+5:30

तमिळनाडूमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या तिघांचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे.

Coimbatore gang rape case Three accused arrested after half encounter shot in leg | प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर

प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर

Coimbatore Crime: तामिळनाडूतील कोइम्बतूर सामूहिक बलात्कारातील तिन्ही आरोपींना एन्काउंटरनंतर अटक करण्यात आली आहे. आरोपींनी एका पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला केला आणि त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्या पायावर गोळी झाडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी आरोपींना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तिघांच्याही पायांना गोळ्या लागल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींची नावे थावासी, करुप्पास्वामी आणि कालीस्वरन अशी आहेत. हे तिघेही शिवगंगई जिल्ह्यातील रहिवासी आहेत आणि कोइम्बतूरमधील एका बांधकाम कंपनीत काम करत होते. सोमवारी एका विशेष पोलिस पथकाने आरोपींना एका मंदिराजवळ घेरले. पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना, आरोपींनी पोलिस अधिकाऱ्यांवर विळ्याने हल्ला केला, ज्यामध्ये हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर यांच्या डाव्या मनगटाला आणि हाताला दुखापत झाली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला, ज्यामध्ये तिन्ही आरोपींच्या पायाला दुखापत झाली. जखमी झाल्यानंतर आरोपींसह पोलिस अधिकाऱ्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिन्ही आरोपींवर आधीच अनेक गुन्हेगारी गुन्हे दाखल आहेत.

२ नोव्हेंबरच्या रात्री या तिन्ही आरोपींनी १९ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना कोइम्बतूर विमानतळाजवळ घडली. पीडिता एका मित्रासोबत कारने बाहेर गेली होती. दोघांचे पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते असे सांगितले जाते. त्यांनी जेवण केले आणि नंतर ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या भागात त्यांनी गाडी थांबवली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास, चोरीच्या मोटारसायकलवरून तिन्ही आरोपी त्या ठिकाणी आले आले. त्यांनी पार्क केलेल्या कारवर दगडफेक केली, विंडशील्ड फोडली आणि प्रियकराला बाहेर ओढून काढले.

आरोपींनी तरुणाला चाकूचा धाक दाखवून धमकावले आणि त्याने प्रतिकार करताच तेव्हा त्याला काठ्या आणि दगडांनी मारहाण केली. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तरुण काही काळासाठी बेशुद्ध पडला. त्यानंतर आरोपींनी पीडितेला जबरदस्तीने कारमधून बाहेर काढले आणि विमानतळापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मोटार रूमसारख्या शेडमध्ये नेले, जिथे त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पहाटे ४:३० वाजता, हल्लेखोरांनी विद्यार्थिनीला सोडून दिले आणि जर तिने हे कोणाला सांगितले तर तिला मारुन टाकण्याची धमकी दिली.

रात्री ११:२५ च्या सुमारास प्रियकर शुद्धीवर आला. त्याने खराब झालेली कार एअरपोर्ट रोडकडे नेली आणि रस्त्याने जाणाऱ्या लोकांकडून मदत मागितली. लोकांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांच्या अनेक पथकांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली तेव्हा आरोपींनी पीडितेला सोडून दिले. तिने जवळच्या भागात पोहोचून फोनवरून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस तिच्यापर्यंत पोहोचले आणि तिला रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे संपूर्ण तामिळनाडूमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Web Title : कोयंबटूर सामूहिक बलात्कार: प्रेमी पर हमले के बाद आरोपी मुठभेड़ में गिरफ्तार

Web Summary : कोयंबटूर सामूहिक बलात्कार के आरोपी मुठभेड़ के बाद गिरफ्तार। उन्होंने एक पुलिस अधिकारी पर हमला किया और पैर में गोली मारी गई। पीड़िता पर हवाई अड्डे के पास हमला किया गया, पहले उसके प्रेमी पर हमला हुआ। तीनों का आपराधिक इतिहास रहा है।

Web Title : Coimbatore Gang Rape: Accused Encountered After Attack on Lover, Arrested

Web Summary : Coimbatore gang rape accused were arrested after an encounter. They attacked a police officer and were shot in the legs. The victim was assaulted near the airport after her boyfriend was attacked. All three had prior criminal records.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.