मलकापूरात पारधी समाजाच्या पालावर सशस्त्र हाणामारी; एकाचा मृत्यू,तीन गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 00:55 IST2019-03-19T00:55:07+5:302019-03-19T00:55:42+5:30

नवस फेडण्याच्या कार्यक्रमादरम्यन किरकोळ कारणावरून मलकापूर शहरातील बसस्थानकानजीक असलेल्या हनुमाननगर परिसरात पारधी समाजाच्या पालावर सोमवारी रात्री दोन गटात हाणामारी झाली.

clashes on the back of Pardhi community in Malkapur; One killed, three seriously injured | मलकापूरात पारधी समाजाच्या पालावर सशस्त्र हाणामारी; एकाचा मृत्यू,तीन गंभीर जखमी

मलकापूरात पारधी समाजाच्या पालावर सशस्त्र हाणामारी; एकाचा मृत्यू,तीन गंभीर जखमी

बुलडाणा - नवस फेडण्याच्या कार्यक्रमादरम्यन किरकोळ कारणावरून मलकापूर शहरातील बसस्थानकानजीक असलेल्या हनुमान नगर परिसरात पारधी समाजाच्या पालावर सोमवारी रात्री दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत अंजनगाव सुर्जी येथील २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेत लवर्या अजवास पवार हा ठार झाला असून तो अंजनगाव सुर्जी येथील रहिवाशी आहे. दरम्यान चरण पवार, कुतूर पवार आणि बॉबी कैलास पवार हे तीघे जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रात्री बारा वाजेच्या सुमारास अकोला येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पारधी पालावर नवस फेडण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान किरकोळ कारणावरून पालावरी दोन गटात वाद होऊन ही घटना घडली. रात्री आठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत गंभीर जखमी असलेल्या लवर्या अजवास पवार याचा बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री सव्वा ११ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली नव्हती. अन्य जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना अकोला येथे हलविण्यात आले आहे. या घटनेतील मृतक हा अंजनगाव सुर्जी येथील असून अन्य जखमी हे यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील असल्याची माहिती रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी दिली.

Web Title: clashes on the back of Pardhi community in Malkapur; One killed, three seriously injured