शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

पालिका अधिकाऱ्यांसोबत केली धक्काबुक्की, अवैध बांधकामावर कारवाई करताना घडला प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 5:31 PM

हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा

ठळक मुद्देअखेर शिंपी यांच्यासह पथकाने हिललाईन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. महापालिका आयुक्तांनी शिंपी यांना पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

उल्हासनगर - शहर पूर्व येथील एका नाल्या किनाऱ्यावरील सुरू असलेल्या अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई साठी गेलेल्या सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्यासह अतिक्रमण पथकाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार झाला. याप्रकरणी सतपाल यांच्यासह अन्य जनावर कारवाई करण्याची प्रक्रिया हिललाईन पोलीस ठाण्यात सुरू असल्याची माहिती शिंपी यांनी पत्रकारांना दिली आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-5 बैरेक नं 1719 येथील कपालेश्वर महादेव मंदिराच्या मागील नाल्याच्या किनारी 3 हजारा पेक्षा मोठे अवैध बांधकाम सुरु असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांना मिळाल्यावर त्यांनी शुक्रवारी काम बंद केले होते. मात्र सुट्टीच्या दोन दिवसात बांधकाम उभे केले. गणेश शिंपी यांनी अतिक्रमण पथकासह बांधकाम ठिकाणी जाऊन बांधकामावर पाडकाम  कारवाई सोमवारी दुपारी 3 वाजता सुरु केली. बांधकाम तोडक कारवाई सुरू होताच सतपाल यांच्यासह अन्य जणांनी विरोध करून पथकासह सहाय्यक आयुक्त शिंपी यांना धक्काबुक्की केली. याप्रकाराने बांधकाम घटनास्थळी वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली. अखेर शिंपी यांच्यासह पथकाने हिललाईन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हिललाईन पोलिसांनी सुरू केली.

शहर अवैध बांधकामाबाबत कुप्रसिद्धी असून खुले भूखंड, शासकीय जाग्यावर सर्रासपणे अवैध बांधकामे केले जाते. यामध्ये स्थानिक राजकीय हस्तक्षेप होत असल्याने बांधकामावर कारवाई होत नसल्याचे टीका सर्वस्तरातून होत असून महापालिका अधिकाऱ्यांना मुंग गिळून गप्प बसावे लागत असल्याची परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. याप्रकारामुळेच राज्य शासनाचे प्रतिनियुक्तीवरील अधिकारी पालिकेत येऊ इच्छित नाही. शहरात सर्वत्र आरसीसी बांधकामे होत असून त्यावर कारवाई का केली जात नाही?. आशा प्रश्न निर्माण झाला. गेल्या सहा महिन्यांपासून अवैध बांधकामावरील कारवाई पालिका आयुक्तांनी म्यान केल्याची टीका शहरातून होत आहे.

सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी टार्गेटवरशहरातील रस्ते मोकळे करणे, हातगाड्यावर कारवाई, रस्ता अतिक्रमणा कारवाई, अवैध बांधकामावर कारवाई आदी सर्व ठिकाणी पथकासह सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी कारवाई करीत असल्याचे चित्र आहे. यामुळे शिंपी भूमाफिया, राजकीय नेते, तथाकित समाजसेवक व पत्रकार यांच्या टार्गेटवर आल्याची चर्चा शहरात रंगली. महापालिका आयुक्तांनी शिंपी यांना पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

टॅग्स :Policeपोलिसulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिका