Video : पेन, डायरी मागण्याच्या बहाण्याने वृद्धाचे पैसे लांबविणाऱ्या भामट्याला नागरिकांनी दिला चोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 06:42 PM2021-07-19T18:42:46+5:302021-07-19T18:43:10+5:30

Crime News :ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अमळनेर बसस्थानकात घडली.

Citizens beat up a person who was stealing money from an old man under the pretext of asking for a pen and a diary | Video : पेन, डायरी मागण्याच्या बहाण्याने वृद्धाचे पैसे लांबविणाऱ्या भामट्याला नागरिकांनी दिला चोप

Video : पेन, डायरी मागण्याच्या बहाण्याने वृद्धाचे पैसे लांबविणाऱ्या भामट्याला नागरिकांनी दिला चोप

Next
ठळक मुद्देभामटयाला पकडल्याचे  कळताच हिंमत पाटील व त्यांची वृद्ध पत्नी तिथे पोहचले आणि नागरिकांसह आजीने या चोराला  काठीने चांगलेच झोडपून काढले.

अमळनेर जि. जळगाव : पेन व डायरी मागण्याच्या बहाण्याने वृद्धाच्या खिशातून ३ हजार ५०० रुपये लांबवणाऱ्या एक भामट्याला पकडून नागरिक व  वृद्धाच्या पत्नीने काठीने झोडपून काढले. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अमळनेर बसस्थानकात घडली.
  

वावडे येथील हिंमत  पाटील हे पत्नीसह अमळनेरात बाजारात आले होते. एक इसमाने त्यांच्याजवळ येऊन पेन मागितला.  परंतु हिंमत पाटील यांनी पेन नाही सांगतच त्याने डायरी मागत  त्यांच्या खिश्यातून साडे तीन हजार रुपये काढून पळ काढला.  पाटील यांनी आरडाओरड करताच नागरिकांनी चोराला  बसस्थानकाजवलील डी.आर.  कन्या शाळेजवळ पकडले. भामटयाला पकडल्याचे  कळताच हिंमत पाटील व त्यांची वृद्ध पत्नी तिथे पोहचले आणि नागरिकांसह आजीने या चोराला  काठीने चांगलेच झोडपून काढले. पैसे मिळाल्यामुळे पोलिसात कोणतीही तक्रार करण्यात आली नाही. 

 

Web Title: Citizens beat up a person who was stealing money from an old man under the pretext of asking for a pen and a diary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.