CID busted bogus call center; 37 people arrested | सीआयडीचा बोगस कॉल सेंटरवर छापा; ३७ जणांना अटक  
सीआयडीचा बोगस कॉल सेंटरवर छापा; ३७ जणांना अटक  

ठळक मुद्दे या कारवाईत एकूण ३७ जणांना अटक केली असून ९ महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी भा. दं. वि. कलम १२० - ब, ४१९, ४२०, ४६८, ४७१, ३८४ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ अन्व्ये गुन्हा दाखल केला आहे. 

गुवाहाटी (आसाम) - गुवाहाटी येथील झू रोडवर असलेल्या अवेणीर प्रा. लि. नावाच्या बेकायदा सुरु असलेल्या कॉल सेंटरवर सीआयडीने कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ३७ जणांना अटक केली असून ९ महिलांचा समावेश आहे. कॉल सेंटर चालविणारा राजेश मुखर्जी उर्फ राजेश खान याला बेड्या ठोकल्या आहेत. 

अतिरिक्त पोलीस महासंचालक एल. आर. बिष्णोई यांच्या मार्गदर्शनाखाली सीआयडीने ही कारवाई केली आहे. या कारवाई २२ मॉनिटर, ४० सीपीयू, २ पेनड्राइव्ह, १ लॅपटॉप, ३२ मोबाईल, काही कागदपत्र आणि डायऱ्या पोलिसांनी जप्त केल्या. तसेच पोलिसांना ७ लाख अमेरिकन लोकांचा तपशील सापडला आहे. दरमहिन्याला ५० लाख या कॉल सेंटरमधून कमवत होते. पोलिसांनी भा. दं. वि. कलम १२० - ब, ४१९, ४२०, ४६८, ४७१, ३८४ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ अन्व्ये गुन्हा दाखल केला आहे.  


Web Title: CID busted bogus call center; 37 people arrested
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.