धक्कादायक! 5 तरुणांचा शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार, पीडिता बेशुद्ध, 3 जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 13:57 IST2022-12-24T13:57:05+5:302022-12-24T13:57:13+5:30

राजस्थानमधील बिकानेर परिसरातून एख धक्कादायक घटना समोर आली आहे. चुरू जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची घटना समोर आले आहे.

churu heart wrenching case 5 youths sexuall assault school girl in churu of rajasthan | धक्कादायक! 5 तरुणांचा शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार, पीडिता बेशुद्ध, 3 जण ताब्यात

धक्कादायक! 5 तरुणांचा शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार, पीडिता बेशुद्ध, 3 जण ताब्यात

राजस्थानमधील बिकानेर परिसरातून एख धक्कादायक घटना समोर आली आहे. चुरू जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची घटना समोर आले आहे. चुरूच्या रतनगड पोलीस ठाणे परिसरात पाच तरुणांनी नववीच्या विद्यार्थिनीचे अपहरण करुन बलात्कार केल्याचे समोर आले आहे. मुलीच्या नातेवाईकांना अपहरणाची माहिती मिळताच त्यांनी तिचा शोध सुरू केला. विद्यार्थी बेशुद्ध अवस्थेत विवस्त्र अवस्थेत कुटुंबीयांना आढळली. पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. इतरांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १५ वर्षीय विद्यार्थ्याच्या काकांनी रतनगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या तक्रारीमुसार, त्यांची भाची गावातील हायस्कूलमध्ये 9वीमध्ये शिकते. 23 डिसेंबर रोजी ती नेहमीप्रमाणे घरातून सकाळी 9 वाजता शाळेत गेली. शाळा अर्धी संपली असताना दीडच्या सुमारास त्यांच्या मोठ्या भावाचा मुलगा धावत घरी आला. त्याने सांगितले की काही लोक त्याच्या बहिणीला घेऊन गेले आहेत. यावेळी भाचीच्या शोधात पडिहारा हवाई पट्टीकडे गेले.

दोन मुले घटनास्थळावरून पळून गेली हवाई पट्टीच्या हद्दीत किकर व इतर अनेक झाडे लावलेली आहेत. तिथे तो आपल्या भाचीला शोधत होता. अहवालानुसार, आरोपींमध्ये गणेश हरिजन, कालू दरोगा, आदिल खान, नारायण सोनी आणि आणखी एक मुलगा होता. त्यांना पाहताच आरोपी तेथून पळू लागले. मात्र तीन आरोपींना पीडितेच्या काकांनी पकडले. आदिल आणि नारायण यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

घरमालकाने 30 भाडेकरूंकडे भाड्याच्या बदल्यात केली शारीरिक संबंधाची मागणी आणि मग...

दरम्यान, शोध घेत असताना इतर लोकही तेथे पोहोचले. लोकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच पोलीस तेथे पोहोचले. लोकांनी पकडलेल्या तीन मुलांना पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर मुलगी बेशुद्ध पडली होती. तातडीने मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
 

Web Title: churu heart wrenching case 5 youths sexuall assault school girl in churu of rajasthan