चुनाभट्टी सामूहिक बलात्कार प्रकरण: तत्कालीन पोलीस अधिकाऱ्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 15:16 IST2019-09-01T15:10:42+5:302019-09-01T15:16:07+5:30

तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chunabhatti gang rape case: Atrocity case against police inspector | चुनाभट्टी सामूहिक बलात्कार प्रकरण: तत्कालीन पोलीस अधिकाऱ्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा

चुनाभट्टी सामूहिक बलात्कार प्रकरण: तत्कालीन पोलीस अधिकाऱ्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा

ठळक मुद्देतरुणीच्या भावाला जातीवरुन अपशब्द वापरले तपासासासाठी अनुभवी अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक नेमण्यात आले.

मुंबई - चुनाभट्टी सामूहीक बलात्कार प्रकरणाचा तपास शनिवारी गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. तपासासासाठी अनुभवी अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक नेमण्यात आले. त्यात तरुणीच्या भावाला जातीवरुन अपशब्द वापरले म्हणून चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रहिवासी असलेली ही तरुणी मुंबईच्या चेंबूर भागात आपल्या भावाकडे आली होती. ७ जुलै रोजी ती मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते, असे सांगून घराबाहेर पडली. त्यावेळी चार नराधमांनी तिच्यावर चेंबूरच्या लाल डोंगर भागात बलात्कार केला. त्या दिवसापासून पीडित तरुणी मरणयातना भोगत होती. बलात्कारामुळे तिला मानसिक धक्का बसला होता. 23 जुलैला तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संतापजनक म्हणजे तिच्यावर अत्याचार करणारे ४ नराधम अजूनही मोकाट आहेत.

Web Title: Chunabhatti gang rape case: Atrocity case against police inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.