वांद्रे खाडीत आढळले चायनीज बनावटीचे पिस्तुल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 21:06 IST2019-04-02T21:05:30+5:302019-04-02T21:06:44+5:30
याप्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास शाहू नगर पोलिसांकडे वर्ग केला असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वांद्रे खाडीत आढळले चायनीज बनावटीचे पिस्तुल
मुंबई - वांद्रे खाडीत परदेशी बनावटीचे पिस्तुल आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास शाहू नगर पोलिसांकडे वर्ग केला असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वांद्रे खाडीवरून लोकल जात असताना ब्रीजवर लोकल येताच अनेकजण हार फुले नारळ, पैसे आदी वस्तू टाकतात. त्या वस्तू काही मुले खाडीत जाऊन काढतात. अशाच प्रकारे तालिब नावाचा मुलगा पैसे, नारळ आदी वस्तू काढण्यासाठी नेहमीप्रमाणे खाडीत उतरला होता. त्यावेळी त्याला लाईन क्रमांक १ आणि २ च्या मध्ये ब्रीज खालील पाण्यात एक पिस्तुल आढळून आले. तालिबने याबाबतची माहिती येथील रेल्वे लाईनवर गस्त घालणाऱ्या वांद्रे रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी ते पिस्तूल ताब्यात घेतले असून चायनीज बनावटीच्या पिस्तूलामध्ये काडतुस आढळले नसून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी शाहू नगर पोलिसांकडे ते सोपवण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले.