सामूहिक अत्याचारानंतर चिमुकलीची अमानुष हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 05:09 AM2020-11-18T05:09:38+5:302020-11-18T05:10:05+5:30

अंधश्रद्धेचा कळस; चाैघांना अटक, अपत्य हाेत नसल्याने अघाेरी कृत्य

Chimukali's inhumane murder after mass atrocities | सामूहिक अत्याचारानंतर चिमुकलीची अमानुष हत्या

सामूहिक अत्याचारानंतर चिमुकलीची अमानुष हत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका चिमुकलीच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समाेर आली असून अंधश्रद्धेतून हा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात एका दाम्पत्याला अटक करण्यात आली असून त्यांनी पुतण्याच्या हातून चिमुकलीची हत्या घडवून आणली आणि तिचे यकृतही खाल्ले.


कानपूर ग्रामीणमध्ये ही घटना घडली. पाेलीस अधीक्षक बृजेश श्रीवस्तव यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, भदरस गावात राहणारी पीडित मुलगी दिवाळीच्या रात्री बेपत्ता झाली हाेती. खेळण्यासाठी गेलेली मुलगी रात्री परत न आल्याने तिच्या पालकांनी पाेलीस आणि शेजाऱ्यांसह शाेध घेतला. परंतु, ती सापडली नाही. 


दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह छिन्नविछन्नावस्थेत गावाजवळच्या जंगलात सापडला. तिच्या शरीरातील अनेक अवयव काढण्यात आले हाेते. पाेलिसांनी तपास करून मुलीच्या शेजारीच राहणाऱ्या अंकुर आणि वीरन कुलील या भावांना अटक केली. पाेलिसी खाक्या दाखवताच त्यांनी या गुन्ह्यातील धक्कादायक माहिती दिली. त्यांनी तिचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केला.

मुलीच्या यकृतासाठी दिले १५०० रुपये
n तरुणांचा काका परशुराम याने १५०० रुपये देऊन एका लहान मुलीचे यकृत आणायला सांगितले हाेते. मुलीवर अत्याचार करण्यापूर्वी दाेघांनी मद्यप्राशन केले हाेते. परशुरामचा विवाह १९९९ मध्ये झाला हाेता. मात्र, अपत्य हाेत नव्हते. लहान मुलीचे यकृत खाल्ल्यास मूल हाेईल, या अंधश्रद्धेतून त्यांनी हे कृत्य केले. 
n मुलीचे यकृत खाल्ल्यानंतर इतर अवयवांची विल्हेवाट लावली. दाेन भावांसह दाम्पत्याला अटक करण्यात आली असून पाेलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी फास्ट ट्रॅक काेर्टात खटला चालविण्याचे आश्वासन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांनी दिले आहे.

Web Title: Chimukali's inhumane murder after mass atrocities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.