शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

महाशिवरात्रीच्या दिवशी अचानक बेपत्ता झालेल्या चिमुरडीचा मृतदेह सापडला 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 12:31 PM

आईसोबत निळकंठेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी गेलेली सात वर्षांची चिमुरडी सोमवार (दि. ४ मार्च ) पासून आकस्मिकपणे बेपत्ता झाली होती.

पौड : महाशिवरात्री निमित्त आईसोबत निळकंठेश्वर येथे दर्शनासाठी गेलेली सात वर्षांची चिमुरडी सोमवार (दि. ४ मार्च ) पासून आकस्मिकपणे बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबाने मुलगी हरवल्याची तक्रार पौड पोलीस ठाण्यात दिली होती. तेव्हापासून पोलिसांकडून दिवसरात्र तिचा शोध घेतला जात होता. मात्र, गुरुवारी (दि.७ मार्च) या सात वर्षीय चिमुरडीचा मृतदेह मुळशी तालुक्यातील डावजे परिसरात आढळून आला. 

श्रुतिकुमारी परशुराम साह (वय -७) या मयत चिमुरडीचे नाव आहे. पोलिसांकडून चिमुरडीची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रुतीकुमारी ही ता. ४ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपल्या आई-बरोबर निळकंठेश्वर मंदीरात दर्शनासाठी गेली असताना आईचा हात सुटून अचानक बेपत्ता झाली होती. बराच वेळ शोध घेऊनही श्रुती न सापडल्याने ती हरवल्याची तक्रार त्याच दिवशी पौड पोलीस स्टेशनला दाखल केली होती. पौड पोलीस त्यादिवसापासून अहोरात्र तपास करत होते. दुर्देवाने गुरुवारी (दि.७)  रोजी पोलिसांना डावजे परिसरात तिचा मृतदेह आढळला. अज्ञाताकडून श्रुतीची हत्या करण्यात आल्याचा अंदाज आहे. शविच्छेदन व पुढील तपासणीसाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठव्यिात आल्याची माहिती पौड पोलीस स्टेशनच्या एपीआय रेखा दूधभाते यांनी दिली, पोलीस पुढील तपास करत आहे. 

टॅग्स :PaudपौडCrime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिस