लॉकडाऊनदरम्यान मुलावर जंगलात नेऊन केले अत्याचार; गळा दाबून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 21:37 IST2020-03-27T21:22:01+5:302020-03-27T21:37:43+5:30
पीडितेच्या कुटूंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

लॉकडाऊनदरम्यान मुलावर जंगलात नेऊन केले अत्याचार; गळा दाबून हत्या
अमरोह - एकीकडे संपूर्ण देश कोरोना विषाणूंविरूद्ध युद्ध छेडत आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका निष्पाप अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करण्यात
आले, त्यानंतर त्याचा गळा दाबून खून करण्यात आला. या घृणास्पद घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पीडितेच्या कुटूंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
बलात्कार आणि खून
मृताच्या वडिलांचे म्हणणे आहे की, आरोपीने आपल्या मुलाला जंगलात पूस लावून घेऊन गेले आणि मुलावर जंगलात लैंगिक शोषण केले आणि नंतर आपले कृत्य उघडकीस येईल या भीतीने त्याची हत्या करण्यात आली. त्याचबरोबर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि मृत मुलगा हे आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते. ते लोक एकत्र जंगल खेळत होते.
अशाप्रकारे ही बाब उघडली गेली
बराच काळ मृत मुलगा घरी परत न आल्यावर कुटुंबीयांनी त्यांच्या धाकट्या मुलाला तुमचा मोठा भाऊ अद्याप का आला नाही? अशी विचारणा केली. त्यानंतर त्याने सांगितले की, आरोपी साहिलबरोबर शेवटच्या वेळेस मोठ्या भावाला पाहिलं होतं. पीडितेच्या कुटूंबाने आरोपीला याबाबत विचारले असता त्याने हकीकत सांगितली. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.