खळबळजनक! चिकन चढ्या दराने विकत असल्याने चाकूने भोसकून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 22:02 IST2020-04-30T21:58:23+5:302020-04-30T22:02:16+5:30

चिकन विक्रीसाठी 35 वर्षीय शिराजने आपल्या झोपडीसमोर छोटा स्टॉल उभा केला होता.

As the chicken was being sold at an inflated rate, he was stabbed to death pda | खळबळजनक! चिकन चढ्या दराने विकत असल्याने चाकूने भोसकून केली हत्या

खळबळजनक! चिकन चढ्या दराने विकत असल्याने चाकूने भोसकून केली हत्या

ठळक मुद्देशिराजने चिकनचा दर सांगितल्यानंतर आरोपीने, बाजारभावापेक्षा चढ्या दराने विक्री करत असल्याने शिराजसोबत वाद घालायला सुरूवात केली.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शाह आलम नावाच्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये चिकन चढ्या दराने विकण्याच्या वादातून 35 वर्षीय व्यक्तीवर चौघांनी चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही घटना बुधवारी दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात घडली. मृत व्यक्ती नाव शिराज असून तो पश्चिम बंगालचा रहिवासी आहे.

याआधी शिराज मासे विकत होता, मात्र लॉकडाऊनमुळे उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्याने चिकन विकायला सुरूवात केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. चिकन विक्रीसाठी 35 वर्षीय शिराजने आपल्या झोपडीसमोर छोटा स्टॉल उभा केला होता. बुधवारी आरोपींपैकी एक जण त्याच्याकडे चिकन खरेदीसाठी आला आणि त्याला दर विचारला. शिराजने चिकनचा दर सांगितल्यानंतर आरोपीने, बाजारभावापेक्षा चढ्या दराने विक्री करत असल्याने शिराजसोबत वाद घालायला सुरूवात केली. नंतर आरोपीचे तीन भाऊ देखील तिथे पोहोचले आणि त्यांनी चाकू, लोखंडी रॉडने शिराजला मारहाण केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

मंगोलपुरी येथील संजय गांधी रुग्णालयात शिराजला दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, अशी माहिती पुढे पोलिसांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शाह आलम नावाच्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अन्य तीन फरार आरोपींचाही शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विजयंता आर्या यांनी दिली.

Coronavirus : पोलिसाविरोधात FIR, होम क्वारंटाईन असलेल्या पोलिसाला घराबाहेर पडणं पडलं महागात

 

वेळात वेळ काढून चिमुकल्या मायराच्या वाढदिवसाला जेव्हा पोलीस हजेरी लावतात...

 

Coronavirus Lockdown : मास्क न घातल्याने सीआरपीएफ जवानाला मारहाण, पोलिसाचे केले निलंबन

 

 

Web Title: As the chicken was being sold at an inflated rate, he was stabbed to death pda