दरमहा २ हजार रुपये हप्त्याची मागणी, चिकन दुकानदाराला त्रिकुटाची मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 19:17 IST2025-07-08T19:16:57+5:302025-07-08T19:17:10+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-४, आशेळेपाडा येथे हबीपूर मुन्सर मलिक यांचा चिकन विक्रीचा व्यवसाय आहे.

Chicken shopkeeper beaten up by trio in ulhasnagar | दरमहा २ हजार रुपये हप्त्याची मागणी, चिकन दुकानदाराला त्रिकुटाची मारहाण 

दरमहा २ हजार रुपये हप्त्याची मागणी, चिकन दुकानदाराला त्रिकुटाची मारहाण 


उल्हासनगर : कॅम्प नं-४, आशेळेपाडा येथील चिकन विक्रत्याकडे दरमहा २ हजार रुपयांची मागणी करून त्याला मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

उल्हासनगर कॅम्प नं-४, आशेळेपाडा येथे हबीपूर मुन्सर मलिक यांचा चिकन विक्रीचा व्यवसाय आहे. परिसरातील गौतम गणेश वानखडे, रोहन उर्फ गोट्या झुंबर व ऐक अनोळखी साथीदार यानी संगणमत करूण रविवारी सायंकाळी मलिक यांच्या चिकन दुकानावर जाऊन बांबूने धाक दाखवत दरमहा २ हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली. तसेच मलिक यांना शिवीगाळ, मारहाण करून दुकानाची तोडफोड केली. मलिक यांच्या तक्रारीवरून तिघा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title: Chicken shopkeeper beaten up by trio in ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.