विवाहित महिलेची पाठलाग करून छेडछाड करणाऱ्या भामट्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 15:02 IST2018-09-20T15:01:30+5:302018-09-20T15:02:03+5:30
निखिल भैये असं आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे

विवाहित महिलेची पाठलाग करून छेडछाड करणाऱ्या भामट्याला अटक
मुंबई - रस्त्यात विवाहित महिला आणि तरुणींची छेड काढणाऱ्या एका रोडरोमियोला ओशिवरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. निखिल विजय भैये असं या आरोपीचं नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पीडितेने घरी येऊन घडलेला सर्व प्रकार तिच्या नवऱ्याला सांगितला. त्यानंतर पीडितेचा पती जाब विचारण्यासाठी निखिलकडे गेला असता निखिलने उडवा उडवीची उत्तरं देत त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेच्या पतीने ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी निखिलला अटक करत त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली.