अनिल देशमुखांच्या दोन सहकाऱ्यांविरोधात आरोपपत्र ईडीकडून दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 13:59 IST2021-08-23T13:47:10+5:302021-08-23T13:59:23+5:30
ED to file chargesheet against Anil Deshmukh’s arrested aides पाचवं समन्स मंगळवारी १७ ऑगस्ट रोजी बजावले होते. मात्र, अनिल देशमुख चौकशीसाठी ED समोर हजर राहिले नव्हते.

अनिल देशमुखांच्या दोन सहकाऱ्यांविरोधात आरोपपत्र ईडीकडून दाखल
अनिल देशमुख चौकशीसाठी का हजर होत नाहीत आणि कधी होणार? याविषयी चर्चा सुरू असताना त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. न्यायालयीन चौकशी पूर्ण झाल्याशिवाय मी चौकशीला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका अनिल देशमूख यांनी मांडली होती. एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी ही माहिती दिली होती. “माझी ईडीच्या बाबतीतली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्विकृत केली आहे. सर्वोच्च न्यायालय ही याचिका लवकरच ऐकून घेणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयामध्ये जाण्याची मुभा सुद्धा दिली आहे. त्यामुळे आता ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी स्वतः ईडीच्या समोर जाणार आहे व त्यांना सहकार्य करणार आहे”, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
अनिल देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात दाखल असलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणात या दोघांना अटक करण्यात आली असून त्यासाठी ईडीने सोमवारी आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीच्या सर्च ओप्रेशनमधून खंडणीचे पैसे स्वीकारण्यात आणि अनिल देशमुख यांच्याकडे हस्तांतरित करण्याच्या त्यांच्या भूमिका स्पष्ट झाल्यानंतर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कुंदन शिंदे आणि सहकारी संजीव पालांडे या दोघांना २५ जून रोजी अटक करण्यात आली.
Alleged money laundering case against former Maharashtra Home Minister Anil Deshmukh: Enforcement Directorate (ED) to file a chargesheet today against the former minister's aides Kundan Shinde and Sanjeev Palande. #Mumbaipic.twitter.com/HhlI7LgujT
— ANI (@ANI) August 23, 2021
ईडीने या प्रकरणात बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाजे याचा जबाब नोंदवला होता, त्यावेळी त्याने 4.70 कोटी रुपये खंडणीचे पैसे गोळा केले होते, त्यापैकी ईडीने देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांकडून चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक ट्रस्टला 4.18 कोटी रुपये दिल्याचं शोधून काढले आहेत. आपली ईडीच्या बाबतीतील याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. सर्वोच्च न्यायालय लवकरच ही याचिका ऐकून घेणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला खालच्या न्यायालयामध्ये जाण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे आता ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मी स्वत: ईडीच्या समोर जाणार आहे व त्यांना संपूर्ण सहकार्य करणार आहे, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अलीकडेच एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले होते.
ईडीने २५ जूनपासून आतापर्यंत देशमुख यांना पाचवेळा तर मुलगा ऋषिकेश यांना दोनवेळा व पत्नी आरती यांना एकदा चौकशीला हजर राहण्याबाबत समन्स बजावले आहे. मात्र ते एकदाही चौकशीला हजर राहिलेले नाहीत. या कारवाईविरोधात त्यांनी सुप्रिम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे ईडीने त्यांना व ऋषिकेश यांना बुधवारी चौकशीला हजर राहण्याबाबत सूचना केली होती. मात्र दोघांनीही तिकडे पाठ फिरवत वकिलांमार्फत पत्र दिले.