एनएसईएल घोटाळ्याप्रकरणी 63 जणांविरोधात आरोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 21:23 IST2018-12-27T21:20:15+5:302018-12-27T21:23:21+5:30
या प्रकरणी 2014 मध्ये सात आरोपींविरोधात तीन आरोपपत्र दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे.

एनएसईएल घोटाळ्याप्रकरणी 63 जणांविरोधात आरोपपत्र दाखल
मुंबई - नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (एनएसईएल) घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या (ईओडब्ल्यू) पथकाने आज 28 हजार 336 पानांचे आरोपपत्र दाखल केले. साडेपाच हजार कोटी रुपयांच्या या घोटाळ्याप्रकरणी 63 आरोपींविरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात राज्य सरकारने नेमलेल्या फॉरेन्सिक ऑडिट व डिजिटल फॉरेन्सिक ऑडिट तज्ज्ञांनी सादर केलेला अहवाल, 520 साक्षीदारांचे जबाब, 509 बॅंक खात्यांची माहिती आणि 22 जीबी सॉफ्ट डेटा यांचा समावेश आहे. या प्रकरणी 2014 मध्ये सात आरोपींविरोधात तीन आरोपपत्र दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे.
एनएसईएल घोटाळ्याप्रकरणी 63 जणांविरोधात आरोपपत्र दाखल
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) December 27, 2018
Today, EOW of @MumbaiPolice has filed a 28,300 page chargesheet against 63 accused (27 individuals & 36 Companies) in the #NSEL case. Earlier in 2014, chargesheets were filed against 07 accused. Further investigation u/s 173(8) Cr.P.C. will continue.
— Mumbai Police (@MumbaiPolice) December 27, 2018