शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
4
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
5
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कार्यभार पुन्हा प्रभारीच्या खांद्यावर !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 8:34 PM

महासंचालकाची नियुक्ती नाही; सोयीनुसार नियुक्तीची पद्धत कायम

ठळक मुद्देराज्यातील लोकप्रतिनिधी व सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे घोटाळे, भ्रष्टाचाराच्या तपासाची जबाबदारी असलेला या विभागाचे प्रमुखपद हे पोलीस महासंचालकांनतरच्या जेष्ठ अधिकाऱ्याकडे सोपविले जात होते.आता लोकसभा निवडणूकीनंतरच याठिकाणी पूर्णवेळ अधिकारी नेमण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. सतीश माथूर यांची २५ एप्रिल २०१६ रोजी नियुक्ती करण्यात आली. ते ३० जुले २०१६ मध्ये पोलीस महासंचालक झाल्यानंतर तब्बल २५ महिने १६ दिवस हे पद रिक्त होते.

जमीर काझीमुंबई - गेल्या जवळपास सव्वा पाच महिन्यापासून महासंचालक पद अनुभविलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) गुरुवारपासून पुन्हा रिक्त ठेवण्यात आले आहे. संजय बर्वे यांची मुंबई आयुक्तपदी निवड केल्यानंतर राज्य सरकारने त्या ठिकाणी अन्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली नाही. त्याऐवजी अप्पर महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. आता लोकसभा निवडणूकीनंतरच याठिकाणी पूर्णवेळ अधिकारी नेमण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.एसीबीच्या गेल्या तीन वर्षात तब्बल २ वर्ष दीड महिना महासंचालक पद पूर्णवेळ अधिकाऱ्याविना रिक्तच राहिले आहे. गुरुवारी पुन्हा बर्वेंचा वारसदार न नेमल्याने या पदाची नियुक्ती राज्य सरकारकडून सोयीनुसार केली जात आहे, अशी चर्चा वरिष्ठ अधिकारी व पोलीस वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. वास्तविक सध्या पोलीस महासंचालक व मुंबईच्या आयुक्ता व्यतिरिक्त पाच महासंचालक कार्यरत आहेत. मात्र राज्य सरकारने सध्या यापैकी एकाचीही नियुक्ती या पदावर केलेली नाही. त्याचप्रमाणे दत्ता पडसलगीकर निवृत्त झाल्याने रिक्त झालेले महासंचालक पदी अन्य अधिकाऱ्याला बढती देण्याची तसदी घेतलेली नाही. मुंबई आयुक्तपदाच्या शर्यतीत असलेले अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) परमबीर सिंह हे पदोन्नतीसाठी दावेदार आहेत.राज्यातील लोकप्रतिनिधी व सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे घोटाळे, भ्रष्टाचाराच्या तपासाची जबाबदारी असलेला या विभागाचे प्रमुखपद हे पोलीस महासंचालकांनतरच्या जेष्ठ अधिकाऱ्याकडे सोपविले जात होते. मात्र डिसेंबर २०१५ मध्ये राज्य सरकारने मुंबईचे आयुक्त पदाचा दर्जा वाढवून त्याठिकाणी बनविण्यात आले. त्यानंतर तत्कालिन होमगार्डचे महासमादेशक अहमद जावेद यांना आयुक्त बनविण्यात आले. त्यामुळे पोलीस महासंचालकांनंतर हे पद दुसऱ्या क्रमांकाच्या जेष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येवू लागली आणि त्यानंतर एसीबी डीजींचा पदाचा नंबर आला. मात्र त्यामध्येही राज्य सरकारने सोयीस्कर भूमिका घेतली आहे. २९ फेब्रुवारी २०१६ ला तत्कालिन प्रमुख विजय कांबळे हे रिटायर झाल्यानंतर तेथे अप्पर महासंचालक असलेल्या संजय बर्वे यांच्याकडून दोन महिने अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर सतीश माथूर यांची २५ एप्रिल २०१६ रोजी नियुक्ती करण्यात आली. ते ३० जुले २०१६ मध्ये पोलीस महासंचालक झाल्यानंतर तब्बल २५ महिने १६ दिवस हे पद रिक्त होते. त्यापैकी विवेक फणसाळकर यांनी दोन वर्षे अतिरिक्त कार्यभार सांभाळल्यानंतर त्यांची ठाण्याला आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यानंतर दीड महिना अप्पर महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडेच अतिरिक्त कार्यभार होता. गेल्यावर्षी १८ सप्टेंबरला संजय बर्वे यांची त्याठिकाणी महासंचालक म्हणून नियुक्ती केली होती. गुरुवारी त्यांचा पदभार पुन्हा तात्पुरत्या स्वरुपात सेठ यांच्याकडे देण्यात आला आहे.एसीबीचे अतिरिक्त प्रभारी कालावधीसंजय बर्वे १ मार्च २०१५ ते २५ एप्रिल २०१६विवेक फणसाळकर ३० जुलै १६ ते ३० जुलै १८रजनीश सेठ २ आॅगस्ट १८ ते १८ सप्टेंबर १८रजनीश सेठ २८ फेब्रुवारी २०१९ पासूनराज्य पोलीस दलात सध्या सुबोध जायस्वाल व संजय बर्वे यांच्याशिवाय संजय पांडे ( होमगार्ड), बिपीन बिहारी (पोलीस गृहनिर्माण), एस.एन.पांडे ( सुधार सेवा), डी. कनकरत्नम ( सुरक्षा महामंडळ) व हेमंत नागराळे ( विधी व तंत्रज्ञ) हे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. यापैकी संजय पांडे हे बर्वे यांच्यापेक्षा एक वर्षांनी वरिष्ठ असले तरी त्यांना न हलविता राज्य सरकारने बर्वे यांची मुंबईची धुरा सोपाविली आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र