नागपुरातील रेशिमबाग मैदानाजवळ समाजकंटकांचा उपद्रव : दगडफेकीमुळे दहशत, तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 23:33 IST2020-02-28T23:31:26+5:302020-02-28T23:33:17+5:30
रेशीमबाग मैदानाजवळ शुक्रवारी रात्री काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

नागपुरातील रेशिमबाग मैदानाजवळ समाजकंटकांचा उपद्रव : दगडफेकीमुळे दहशत, तणाव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेशीमबाग मैदानाजवळ शुक्रवारी रात्री काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री १०च्या सुमारास समाजकंटकांचे एक टोळके आरडाओरड करून परिसरात गोंधळ घालू लागले. त्यांना काही तरुणांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांच्यावर दगड भिरकावले. ते बघून परिसरातील मंडळी सरसावली. त्यांनी पोलिसांनाही सूचना दिली. इमामवाडा आणि परिसरात गस्त करणारी पोलीस वाहने धावून आली. तोपर्यंत तेथे मोठी गर्दी आणि तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी अनेकांची धरपकड करून त्यांना इमामवाडा ठाण्यात नेले. वृत्त लिहिस्तोवर आरोपींची चौकशी केली जात होती.