डॉक्टरचा पत्नीवर चाकूहल्ला; गळ्यावर वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 05:56 IST2018-12-25T05:56:29+5:302018-12-25T05:56:40+5:30

क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात डॉक्टरने आपल्या पत्नीवर चाकू हल्ला केल्याची घटना तुकारामनगर परिसरात रविवारी घडली.

Chakahala on the doctor's wife; Strike on the throat | डॉक्टरचा पत्नीवर चाकूहल्ला; गळ्यावर वार

डॉक्टरचा पत्नीवर चाकूहल्ला; गळ्यावर वार

डोंबिवली : क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात डॉक्टरने आपल्या पत्नीवर चाकू हल्ला केल्याची घटना तुकारामनगर परिसरात रविवारी घडली. याप्रकरणी डॉ. संतोष देसाई (५७) यांच्याविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पूर्वेतील तुकारामनगर परिसरात देसाई हे पत्नी लीला (४९) आणि दोन मुलांसह राहतात. रविवारी सकाळी संतोष यांनी पत्नीकडे बोगस सर्टिफिकेटचे कागद मागितले. लीला यांनी कागदपत्रे नसल्याचे सांगितले. याचा राग आल्याने संतोष यांनी लीला यांचे डोके भिंतीवर आपटले, चाकू घेऊन धमकावण्यास सुरुवात केली. झटापटीत लीला यांच्या गळ्यावर वार झाला. जखमी लीला यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Chakahala on the doctor's wife; Strike on the throat