उल्हासनगरात चैन स्नॅचिंग व मोटर सायकल चोरटा जेरबंद
By सदानंद नाईक | Updated: December 5, 2025 20:08 IST2025-12-05T20:07:25+5:302025-12-05T20:08:00+5:30
त्याच्याकडून ३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला असून तपासात दोन गुन्हे उघड झाले.

उल्हासनगरात चैन स्नॅचिंग व मोटर सायकल चोरटा जेरबंद
सदानंद नाईक, उल्हासनगर : शहर गुन्हे अन्वेषण विभागाने शहाड येथील अमरडाय कंपनी जवळून चैन स्नॅचिंग व मोटर सायकल चोराला जेरबंद केले. त्याच्याकडून ३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला असून तपासात दोन गुन्हे उघड झाले.
उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागातील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी अशोक पवार व पोलीस शिपाई नितीन बैसाणे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करीत असताना बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, चैन स्नॅचिंग व मोटर सायकल चोरी करणारा एक इसम हा अमरडाय कंपनी शहाड येथे येणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांना याबाबत माहिती दिल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय काजारी, पोलीस हवालदार सुरेश जाधव, सतीश सपकाळे, प्रकाश पाटील व अविनाश पवार यांनी अमरडाय कंपनी, शहाड या ठिकाणी छापा कारवाई केली. शेरअली इमाम फकीर संशयित इसमाला अटक केली असता गणेश लॉन्ड्रीची चाळ, गायत्री नगर भिवंडी येथिल राहणारा असल्याचे उघड झाले.
पोलीस तपासात शेरअली इमाम याच्यावर पडघा पोलीस ठाण्यात त्याच्यासह साथीदार मुसा आणू इराणी यांच्यावर गुन्हा दाखल असून उल्हासनगर कार्यक्षेत्रात आणखी दोन चैन स्नॅचिंग केल्याचे तपासात माहिती उघड झाले. त्याच्याकडून टीव्हीएस कंपनी मोटरसायकल व सोन्याचे दागिने असे एकूण ३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांनी दिली.