मोनोरेलचा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर एसीबीच्या जाळयात अडकला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 01:20 PM2021-08-17T13:20:59+5:302021-08-17T20:12:42+5:30

Bribe Case : २० लाखाच्या लाचेची मागणी, एसीबीकड़ून तपास सुरु

The CEO of Monorail got caught in the trap of ACB | मोनोरेलचा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर एसीबीच्या जाळयात अडकला

मोनोरेलचा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर एसीबीच्या जाळयात अडकला

Next
ठळक मुद्दे४० लाख रूपयांचे बिल आणि ११ लाख गँरंटी रक्कम मुंबई मोनोरेलकड़े थकीत होते.

मुंबई : कंत्राटदार कंपनीकड़ून २० लाख रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी मोनोरेलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. डी. एल.एन. मुर्ती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळयात अडकले आहे. याप्रकरणी एसीबीने गुुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे. 

             

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनी असून कंपनीला मुंबई मोनोरेल प्रकल्पाअंतर्गत साफसफाई, हाउसकिपींग, मेंटनन्स, कस्टमर सर्व्हिसचे जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०२० पर्यंतचे कंत्राट मिळाले होते. ऑगस्ट २०२० रोजी कंत्राटाप्रमाणे काम पूर्ण केले. ठरल्याप्रमाणे कामाचे बिल २ कोटी १० लाख तसेच २२ लाख गँरंटी रक्कम अदा करण्यात होती. त्यापैकी, ४० लाख रूपयांचे बिल आणि ११ लाख गँरंटी रक्कम मुंबई मोनोरेलकड़े थकीत होते.

         

मूर्ती यांनी तक्रारदार यांची फाईल स्वतःकड़े अडकवून २० लाख रूपयांची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीकड़े धाव घेतली. गेल्या महिन्यात २ जुलै रोजी एसीबीने केलेल्या पडताळणीत मूर्ती यांनी पैसे मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, सोमवारी याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. यात, मूर्ती यांच्या मालमत्तेची कुंडलीही एसीबीकड़ून काढण्यात येत आहे.

Web Title: The CEO of Monorail got caught in the trap of ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.