बाबो! दीड कोटी रूपयांच्या सोन्याची पेस्ट अंडरविअरमध्ये लपवली, पकडले गेले दुबईहून आलेले तस्कर..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 11:23 AM2021-02-15T11:23:54+5:302021-02-15T11:32:17+5:30

Gold Smuglling : तस्करांनी सोन्याची पेस्ट करून ती अंडरविअरच्या बेल्टमध्ये लपवली होती. मात्र, हे लोक कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांपासून वाचू शकले नाही.

CCSI airport lucknow custom department seized gold of worth 1.5 crore | बाबो! दीड कोटी रूपयांच्या सोन्याची पेस्ट अंडरविअरमध्ये लपवली, पकडले गेले दुबईहून आलेले तस्कर..

बाबो! दीड कोटी रूपयांच्या सोन्याची पेस्ट अंडरविअरमध्ये लपवली, पकडले गेले दुबईहून आलेले तस्कर..

Next

उत्तर प्रदेशची(Uttar Pradesh) राजधानी लखनौमधील चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी कस्टम विभागाने(Custom Dept) सोन्याची तस्करी(Gold Smuglling) हाणून पाडली आहे. चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून(Dubai) आलेल्या चार व्यक्तींकडून जवळपास दीड कोटी रूपयांचं सोनं जप्त केलं आहे. कस्टम विभागाने चेकिंगदरम्यान जवळपास ३ किलो सोन जप्त केलं आहे. 

तस्करांनी सोन्याची पेस्ट करून ती अंडरविअरच्या बेल्टमध्ये लपवली होती. मात्र, हे लोक कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांपासून वाचू शकले नाही. कस्टम डेप्युटी कमिश्नर निहारिका लाखा यांनी सांगितले की, दुबईहून विमान FX 8325, SG 138 AI चं विमान AI 1930 च्या माध्यमातून लखनौला पोहोचलेल्या चार व्यक्तींकडे एकूण ३ किलो सोनं जप्त केलं गेलं आहे. या सोन्याची किंमत १ कोटी ४९ लाख १० हजार रूपये इतकी आहे. या सोन्याची पेस्ट करून अंडरविअरच्या बेल्ट भागात ठेवण्यात आली होती.

निहारिका लाखा यांनी सांगितले की, या लोकांनी जीन्सखाली दोन अंडरविअर घातल्या होत्या. संशय आल्याने कस्टम अधिकाऱ्यांनी त्यांची चेकिंग केली आणि सोनं सापडलं. सीमा शुल्क उपायुक्तांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या सोन्याबाबत चारही प्रवाशांना विचारण्यात आले. पण ते काहीच उत्तर देत नाहीयेत. त्यांच्याकडे काही कागदपत्रेही नव्हती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सोनं जप्त केलं. आता चार लोकांच्या कनेक्शनबाबत तपास सुरू आहे. तसेच या चारही लोकांनी वेगवेगळी फ्लाइट का घेतली याचीही चौकशी सुरू आहे. 
 

Web Title: CCSI airport lucknow custom department seized gold of worth 1.5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.