कोळसा घोटाळ्यातील मास्टरमाईंड अनुप माझीच्या अनेक ठिकाणांवर सीबीआयची छापेमारी
By पूनम अपराज | Updated: February 19, 2021 18:55 IST2021-02-19T18:54:02+5:302021-02-19T18:55:16+5:30
Coal Scam Cbi Raid in west bengal : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही लाला याच्या बंगाल दौर्यादरम्यान ममता बॅनर्जी सरकारवर ताशेरे ओढले होते.

कोळसा घोटाळ्यातील मास्टरमाईंड अनुप माझीच्या अनेक ठिकाणांवर सीबीआयची छापेमारी
कोलकाता - कोळसा घोटाळा प्रकरणात सीबीआयने आज पश्चिम बंगालमधील ४ जिल्ह्यात १३ ठिकाणी छापा टाकत आहे. अनूप माझी उर्फ लाला याच्या जवळच्या नातलगांच्या ठिकाणी देखील छापे टाकले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही लाला याच्या बंगाल दौर्यादरम्यान ममता बॅनर्जी सरकारवर ताशेरे ओढले होते.
जानेवारीच्या सुरुवातीला सीबीआयने रॅकेटचा मास्टरमाईंड अनुप माझी उर्फ लाला आणि त्याचा साथीदार बिनॉय मिश्रा यांच्या घरावर छापा टाकला होता. ईडीच्या पथकाने गणेश बागडिया आणि संजय सिंह यांचे कार्यालय आणि निवासस्थानी शोधमोहीम राबविली. बगडिया आणि सिंग हे दोघेही विनय मिश्रा यांच्या सहकार्याने सिंडिकेट चालवणाऱ्या अवैध कोळसा रॅकेटचा कथित प्रमुख सुत्रधार अनुप माझी उर्फ लाला याच्याशी संपर्कात असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
यापूर्वी गेल्या वर्षी २८ नोव्हेंबर रोजी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशात कोळसा तस्करीच्या रॅकेटला रोखण्यासाठी ४५ ठिकाणी छापा टाकला होता. दरम्यान, बंगाल-झारखंड सीमेवरील कोळसा पट्ट्यात उघडपणे अवैधपणे व्यापार करणार्या माझीच्या काही साथीदारांच्या घरीही झडती घेण्यात आली.