रेल्वे तिकीट दलालास पकडले; जादा दराने देत होता तिकिटं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 18:46 IST2021-05-18T18:45:59+5:302021-05-18T18:46:18+5:30
railway Ticket Agent Arrested : रेल्वे गुन्हे शाखेची कारवाई

रेल्वे तिकीट दलालास पकडले; जादा दराने देत होता तिकिटं
गोंदिया : आपल्या खासगी आयडीवरून तिकीट तयार करून अतिरिक्त दर आकारून ग्राहकांना तिकीट उपलब्ध करून देणाऱ्या दलालास रेल्वे सुरक्षा बलच्या गुन्हे शाखेने पकडले. सोमवारी (दि.१७) लगतच्या बालाघाट (मध्यप्रदेश) जिल्ह्यातील ग्राम हिर्री येथेही कारवाई करण्यात आली आहे.
तिकीट दलाल देवेंद्र रामनाथ पंचवारे (३०,रा.हिर्री) हा आपल्या ४ वेगवेगळ्या खासगी आयडीवरून रेल्वे ई-तिकीट तयार करण्याचा व्यवसाय करतो. याबाबत मिळालेल्या माहितीवरून गु्न्हे शाखेचे निरीक्षक अनिल व सहायक उपनिरीक्षक एस.एस.ढोके, आर.सी.कटरे व आरक्षक एस.बी.मेश्राम यांनी कारवाई करून सोमवारी (दि.१७) देवेंद्र पचवारे याला ताब्यात घेतले. पंचवारे हा आपल्या वेगवेगळ्या ४ आयडीवरून ई-तिकीट तयार करून त्यावर अतिरिक्त दर आकारून नागरिकांना उपलब्ध करून देत होता. यावर रेल अधिनियम कलम १४३ अंतर्गत गुन्हा नोंद करून त्याला बालाघाट पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले. त्याने २६ हजार ३३६ रूपये किंमतीच्या २६ ई-तिकीट बनविल्याचे उघडकीस आले आहे. त्याला मंगळवारी (दि.१८) जबलपूर येथील रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले.