दुकानफोडी करणाऱ्या महिलांची टोळी पकडली ; बारामती शहर पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 15:44 IST2020-06-30T15:43:28+5:302020-06-30T15:44:26+5:30
कापडाच्या दुकानात चोरी करणाऱ्या ५ महिलांची टोळी शहर पोलिसांनी अटक केली.

दुकानफोडी करणाऱ्या महिलांची टोळी पकडली ; बारामती शहर पोलिसांची कारवाई
बारामती: बारामती शहरात कापडाच्या दुकानात चोरी करणाऱ्या ५ महिलांची टोळी शहर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी शहरातील आमराई वसाहत येथील महिला आरती शंकर पाथरकर (वय २५ वर्षे ),सारिका लाला भाले (वय ३० वर्षे ),दुर्गा आकाश साळुखे (वय २५ वर्षे) ,शकिला इस्माईल कुरेशी (वय २२ )यांना ताब्यात घेतले .
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात महावीर पथ येथील मे.राजस्थान सारीज दुकानाचे बेसमेंट गाळयातुन अज्ञात चोरटयांनी गाळयाचे शटर उचकटुन त्यातील माल चोरी करून चोरून नेल्याचा प्रकार घडला होता .याबाबत शहर पोलीस स्टेशन येथे १२ एप्रिल रोजी दुकानफोडीचा गुन्हा दाखल होता. त्याप्रमाणे गुन्हयातील चोरीचा ,अज्ञात आरोपींचा शोध बारामती शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला.पोलिसांनी तपास केल्यावर महिला आरोपींनी गुन्हा केल्याची कबूली दिली.त्यांचेकडून तपासादरम्यान १९,१६०/-रुपये किंमतीचा गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे . गुन्हयाचा तपास अदयाप सुरू आहे.
ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर , पोलीसनिरीक्षक औदुंबर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीसउपनिरीक्षक पद्मराज गंपले, योगेश शेलार, सहा.फौजदार संदिपान माळी, पोलिस नाईक ओंकार सिताप,पोलिस् कॉन्स्टेबल पोपट नाळे, राजेश गायकवाड, सिध्देश पाटील, पोपट कोकाटे ,सुहास लाटणे, अंकुश दळवी,दशरथ इंगवले, अजित राऊत, योगेश कुलकर्णी,अकबर शेख ,उमेश गायकवाड यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला .