सागवान भरलेला ट्रॅक्टर पकडला; अंगावर बाईक चालवून केले जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 21:23 IST2022-08-02T21:22:41+5:302022-08-02T21:23:23+5:30
Attack : वनपरिक्षेत्राधिकाऱ्यावर फर्निचर मार्ट मालकाचा हल्ला;

सागवान भरलेला ट्रॅक्टर पकडला; अंगावर बाईक चालवून केले जखमी
सालेकसा (गोंदिया) : येथील विनोद फर्निचर मार्ट समोर रोडवर सागवान लाकडाने भरलेला ट्रॅक्टर पाहून गस्तीवर असलेले वनपरिक्षेत्राधिकारी मंगेश बागडे यांनी ट्रॅक्टर चालकाला सागवानची वाहतूक परवाना (टीपी) विचारले असता वाहतूक परवाना न दाखवता मालकाला बोलावले. त्याच्या मालकाने वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या अंगावर बाईक चालवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या हल्ल्यात वनपरिक्षेत्राधिकारी गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि.२) दुपारी २.१५ वाजता घडली. सागवान भरलेला ट्रॅक्टर जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलेला आहे. फर्निचर मार्टचे मालक विनोद जैन यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.