खळबळजनक! लाचप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याविरोधातच एसीबीत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 19:08 IST2019-06-13T19:08:19+5:302019-06-13T19:08:34+5:30
पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

खळबळजनक! लाचप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याविरोधातच एसीबीत गुन्हा दाखल
मुंबई - जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष गायकवाड यांनी २ लाख लाच मागितली म्हणून एसीबीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
दक्षिण मुंबईतील एका प्रमुख पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने एकाकडे तब्बल दोन लाखाची मागणी केल्याची धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला आहे. शिरीष मुरलीधर गायकवाड असे त्यांचे नाव असून जे.जे. मार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. प्रभारी अधिकाऱ्याच्या लाचखोरीचा प्रकार उघडकीस आल्याने मुंबई पोलीस वर्तुळात गुरुवारी खळबळ उडाल दरम्यान, गायकवाड हे अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
जे.जे.मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहात असलेल्या एका तरुणावर पूर्वी काही गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर घातक कृत्याला लगाम घालण्यासाठी (एम.पी.डी.ए.) प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची भीती पोलिसांकडून दाखविण्यात येत होती. कारवाई टाळावयाची असल्यास त्याने दोन लाख रुपये द्यावेत, अशी मागणी वरिष्ठ निरीक्षक गायकवाड यांनी त्याच्या सहकाऱ्यामार्फत पोलीस ठाण्यात बोलावून केली होती. तरुणाला ही रक्कम द्यावयाची नसल्याने त्याने त्याबाबत एससीबीकडे तक्रार दिली. त्याने रचलेल्या सापळ्यानुसार फिर्यादी तरुण हा पुन्हा पोलीस ठाण्यात जावून त्यासंबंधी गायकवाड यांच्याशी चर्चा करुन त्याबाबतचे संभाषण मोबाईलमध्ये रेकार्ड केले. त्यावर पथकाने गायकवाड यांच्याकडे चौकशी केली असता त्याने पैशाची मागणी केल्याची कबुली दिली. त्यानुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम१९८८ कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या कक्षातील कागदपत्राची तपासणी करण्यात येत असून लवकरच अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांवर खंडणी, लाचखोरीचे गुन्हे
सदरक्षणाय खलनिग्रहणाय, हे बिरुदावली असलेल्या मुंबई पोलीस दलासाठी गुरुवारचा दिवस लाजिरवाणा ठरला. एका सात वर्षाच्या मुलाला घरगुती वादातून अपहरण करुन दीड कोटीची मागणी केल्याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अमोल चव्हाण याला औरंगाबाद पोलिसांनी सकाळी अटक केली. तर पोलीस ठाण्याचा प्रमुख असलेल्या शिरीष गायकवाड यांनी प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी दोन लाखाची मागणी केल्याचे उघड झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी भ्रष्टाचार व गैरशिस्त खपवून न घेण्याचा इशारा दिला असतानाही पोलिसांची कृष्णकृत्ये सुरुच असल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे.
मुंबई - जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष गायकवाड यांनी २ लाख लाच मागितली म्हणून एसीबीमध्ये गुन्हा दाखल https://t.co/thzM8ylhGc
— Lokmat (@MiLOKMAT) June 13, 2019