शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

हडपसर येथे कुत्र्यावर चुकीच्या उपचार केल्यामुळे दोन डॉक्टरांसह सहायकावर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 19:32 IST

पाळीव कुत्रा दगावल्यामुळे श्वान मालकाने चुकीचे उपचार करणाऱ्या पशूवैदयकीय डॉक्टर व एका सहाय्यकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी औंध येथील शासकीय पशुवैद्यकीय चिकित्सालय येथे केला पंचनामा विनापरवाना दवाखाना सुरू केल्याप्रकरणी डॉक्टरांचा परवाना देखील रद्ददोषी डॉक्टर व विनापरवाना डॉक्टरांना अद्दल घडावी यासाठीच पोलीस ठाण्यात तक्रार

हडपसर : पाळीव कुत्रा दगावल्यामुळे श्वान मालकाने पाठपुरावा करून चुकीचे उपचार करणाऱ्या व विनापरवाना पशु चिकित्साल चालविणाऱ्या दोन पशूवैदयकीय डॉक्टर व एका सहाय्यकाविरूध्द हडपसर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा व चुकीचे उपचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अशी माहिती अशी, याप्रकरणी डॉ. अनिल रामकृष्ण देशपांडे (वय 47, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. तर डॉ. दिलीप सोनुने, डॉ अपुर्वा गुजराथी व सहाय्यक श्रीमती इशीतलाल अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी तुकाईदर्शन येथील योगेश गवळी यांचे श्वान आजारी पडले होते. त्यामुळे त्यांनी डीपी रोड येथील माय पेट केअर या पशुवैदयकीय दवाखान्यात त्याला उपचारासाठी नेले. तेथे डॉक्टर उपल्बध नसताना सहायकाने चुकीचे उपचार केले.दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास श्वानाचा मृत्यू झाला. त्यानंतर गवळी यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. पोलिसांनी औंध येथील शासकीय पशुवैद्यकीय चिकित्सालय येथे पंचनामा केला. त्यावेळी सदर श्वानाचा कावीळ झालेली होती. मात्र त्याच्यावर गॅस्ट्रोचे उपचार करण्यात आल्याची बाब निदर्शनास आली. हडपसर पोलिसांनी पुढील तपास केला असता सदर दवाखान्यास नागपूर येथील पशुवैदयकीय कौन्सीलची मान्यता नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी दवाखाना सील करून संबधित दोषी असलेल्या तिघांवर गुन्हा दाखल केला. विनापरवाना दवाखाना सुरू केल्याप्रकरणी डॉक्टरांचा परवाना देखील रद्द करण्यात आला आहे. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हेमचंद्र खोपडे, सहाय्यक निरिक्षक किरण लोंढे, बजरंग धायगुडे यांनी याप्रकरणी तपास केला.याबाबत श्वान मालक योगेश गवळी म्हणाले, ''श्वानाचे वय दिड महिन्याचे होते. आम्ही घरातील सर्वजण त्याची प्रेमाणे काळजी घेत होतो. घरातील थोरा-मोठयांना त्याचा लळा लागला होता. अचनाक त्याचा मृत्यू झाल्याने सर्वांना हळहळ वाटत आहे. श्वानाच्या प्रेमापोटीच पाठपुरावा करून दोषी डॉक्टर व विनापरवाना डॉक्टरांना अद्दल घडावी यासाठीच पोलीस ठाण्यात तक्रार दिली.''

टॅग्स :HadapsarहडपसरPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdogकुत्राDeathमृत्यूdoctorडॉक्टर