गाडी भाड्याने घेऊन फसवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 21:08 IST2021-08-16T20:59:48+5:302021-08-16T21:08:27+5:30
Cheating Case : मीरारोड येथील टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असणाऱ्या कृष्णकुमार देवासीकडून अभय निकम याने महागडी इनोव्हा क्रिस्टा गाडी भाड्याने घेतली होती.

गाडी भाड्याने घेऊन फसवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
मीरारोड - गाडी भाड्याने घेऊन भाडे न देताच गाडी तिसऱ्या व्यक्तीला देणाऱ्या एका सराईत भामट्यासह साथीदारावर काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरारोड येथील टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असणाऱ्या कृष्णकुमार देवासीकडून अभय निकम याने महागडी इनोव्हा क्रिस्टा गाडी भाड्याने घेतली होती. निकम याने गाडीचे भाडे तर दिले नाहीच पण ती दुसऱ्याला परस्पर दिली. त्याने तिसऱ्याला काही पैसे घेऊन गाडी देऊन टाकली.
देवासी याला सदर प्रकार कळताच त्याने काशीमीरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी निकम व त्याचा साथीदार अजय दुबे वर गुन्हा दाखल केला. निकम हा सराईत भामटा असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. नोटबंदी काळात निकमने स्वतःला बँक कर्मचारी असल्याचे भासवून जुन्या नोटा बदलून देतो म्हणून मनोरा आमदार निवास येथे २५ लाखांची अफरातफर केली होती. त्या प्रकरणात सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे हे तपास करत अडून दोघे ही आरोपी पसार झाले आहेत.