१९ वर्षीय प्रकल्पग्रस्त युवतीच्या आत्महत्येप्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 15:07 IST2021-04-04T15:05:21+5:302021-04-04T15:07:10+5:30
Suicide : आशा तुळशीराम घटे या १९ वर्षीय प्रकल्पग्रस्त युवतीने आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली होती.

१९ वर्षीय प्रकल्पग्रस्त युवतीच्या आत्महत्येप्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
ठळक मुद्दे भादंवि कलम ३०६ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त करणे याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तीन दिवसानंतर वेकोलीच्या नियोजन अधिकारी जी पुल्लया यांच्यावर गुन्हा दाखल केलेला असून त्याच्या अटकेकडे लक्ष लागले आहे.
चंद्रपूर : अखेर आशा घटे आत्महत्या प्रकरणी क्षेत्रीय नियोजन अधिकारी जी.पूल्लया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून भादंवि कलम ३०६ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त करणे याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील मुख्य महाप्रबंधक कार्यालयातील क्षेत्रीय नियोजन अधिकाऱ्याच्या दप्तर दिरंगाई आणि अपमानास्पद वागणुकीने त्रस्त होऊन सास्ती येथील आशा तुळशीराम घटे या १९ वर्षीय प्रकल्पग्रस्त युवतीने आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली होती. तीन दिवसानंतर वेकोलीच्या नियोजन अधिकारी जी पुल्लया यांच्यावर गुन्हा दाखल केलेला असून त्याच्या अटकेकडे लक्ष लागले आहे.