Case filed against two kinner Gurdaspur Punjab | धक्कादायक! दोन किन्नरांनी कापला तरूणाचा प्रायव्हेट पार्ट, अनेक दिवस बळजबरीने करून घेतलं त्याच्याकडून काम...

धक्कादायक! दोन किन्नरांनी कापला तरूणाचा प्रायव्हेट पार्ट, अनेक दिवस बळजबरीने करून घेतलं त्याच्याकडून काम...

(प्रातिनिधीक छायाचित्र) 

अनेकदा एकीकडे तृतीयपंथीयांना आनंदाच्या क्षणी घरी बोलवणं शुभ मानलं जातं. त्यावेळी तृतीयपंथीयांना पूजलं जातं. पण पंजाबच्या गुरदासपूरमध्ये दोन तृतीयपंथीयांनी केलेला एक अजब गुन्हा समोर आला आहे. इथे दोन तृतीयपंथीयांनी एका तरूणाला फसवून त्याच्याकडून अनेक महिने काम करून घेतलं आणि नंतर नशेत त्याचा प्रायव्हेट कापला. 

तरूणाच्या आईला जेव्हा याबाबत कळाले तेव्हा तिने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही तृतीयपंथीयांविरोधार तक्रार नोंदवली असून त्यांना अटक करण्यासाठी छापेमारी सुरू आहे. पीडित तरूणाने सांगितले की, तो गुरदासपूरमध्ये मातेच्या जागरणात काम करून घर चालवत होता. यादरम्यान त्याची ओळख सोनिया नावाच्या तृतीयपंथीयाशी झाली.

सोनियाने आधी त्याच्याशी मैत्री केली आणि नंतर त्याला घरी घेऊन जात होती. अनेकदा ती त्याला कार्यक्रमांना सोबतही घेऊन गेली. नंतर सोनियाने तरूणाची ओळख गुरू परवीन तृतीयपंथीयासोबत करून दिली. तरूण अनेक महिने परवीनच्या घरचंही काम करत होता.

अनेक महिने काम केल्यावर सोनिया त्याला घरी परत जाऊ देत नव्हती आणि त्याला मारहाणही करत होती. एक दिवस सोनियाने त्याला नशेचं औषध दिलं आणि त्याला अमृतसरला घेऊन गेली. तिथे जाऊन तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि त्याला परवीनच्या घरी नेऊन सोडलं. 

दोन दिवसांनंतर तो तिथून पळून घरी आला आणि त्याने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेलं. पीडित तरूणाची आई म्हणाली की, तिने मुलासाठी अनेक स्वप्ने पाहिली होती. त्याचं लग्न करायचं होतं आणि वंशही वाढवायचा होता. पण त्या दोन तृतीयपंथीयांनी तिच्या मुलाचं आणि तिची जगणं नरक केलंय.

एसएचओ गुरूदासपूर जबरजीत सिंह यांनी सांगितले की, पीडित मुलाच्या आईचा जबाब नोंदवण्यात आला आहे. ज्यात त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाचा परवीन आणि सोनियाने प्रायव्हेट पार्ट कापला. आता दोन्ही आरोपींचा शोध सुरू आहे. दोघेही फरार आहेत.

जुन्या वैरातून धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, एकजण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी

पित्याला १४ वर्षीय विवाहितेचे सतत माहेरी येणे खटकले; रागाच्या भरात गळा दाबून केली हत्या

Web Title: Case filed against two kinner Gurdaspur Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.