उल्हासनगरात लॉकडाऊनकाळात दुकानांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 01:43 PM2020-05-23T13:43:58+5:302020-05-23T13:49:12+5:30

शहर हद्द बंद असताना मध्यरात्री ट्रकने साहित्य भरभरून येत असलेल्या गाड्याची चोकशी होत नसल्याने महापालिका व पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे.

Case filed against shops during lockdown in Ulhasnagar pda | उल्हासनगरात लॉकडाऊनकाळात दुकानांवर गुन्हे दाखल

उल्हासनगरात लॉकडाऊनकाळात दुकानांवर गुन्हे दाखल

Next
ठळक मुद्देउल्हासनगरात दुकानाच्या मागच्या शटर मधून साहित्य विक्री सुरु असून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत होती.दुकाने सर्रासपणे उघडत असल्याने अखेर शुक्रवारी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, तुषार सोनावणे, अजय एडके यांनी विविध दुकानावर कारवाई करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

उल्हासनगर : लॉकडाऊनदरम्यान दुकाने उघडण्यास बंदी असताना दुकाने उघडी ठेऊन साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानावर महापालिकेच्या तक्रारीवरून विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाले. तसेच शहर हद्द बंद असताना मध्यरात्री ट्रकने साहित्य भरभरून येत असलेल्या गाड्याची चोकशी होत नसल्याने महापालिका व पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे.


उल्हासनगरात दुकानाच्या मागच्या शटर मधून साहित्य विक्री सुरु असून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून झाला. दरम्यान दुकाने सर्रासपणे उघडत असल्याने अखेर शुक्रवारी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, तुषार सोनावणे, अजय एडके यांनी विविध दुकानावर कारवाई करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अप्पू चीचारीया, जगदीश गोस्वामी, नझीर हुसेन, सोनम शेख, सुनील नागदेव, खेमचंद पंजाबी, अनिल व सुनील पंजाबी, हिरेन वनरा, नारायण कुमावत, रमेश कुमावत तसेच लालचक्की व नेताजी चौकातील भवानी स्वीट, साईबाबा फुटवेअर, मिनर्वा फुटवेअर आदी विरोधात उल्हासनगर, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


शहरात कोनोराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शहराच्या हद्द बंद केल्या असे महापालिकेकडून सांगितले जाते. मात्र मध्यरात्री जीवनावश्यक वस्तूचा अपवाद वगळता इतर साहित्य येतेच कसे? असे प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. शुक्रवारी रात्री फटक्याचा ट्रक पकडला असून पोलीस तपास अरीत असल्याचे मेसेज सोशलं मिडीयावर फिरत आहेत. तर दारूच्या दुकानात घरपोच पार्सल नव्हेतर थेट विक्री होत असल्याचे तत्कालीन आयुक्ताच्या  निदर्शनात आल्यावर, त्यांनी पत्रक काढून कारवाईचा इशारा दिला होता. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवती, कार्याध्यक्ष दीपक छटवाणी यांनी व्यापाऱ्यांना दुकानाची साफसफाई साठी दुकाने उघडण्याची गेल्या आठवड्यात परवानगी मागितली होती. तसेच साहित्य खराब होण्याची भीती व्यक्त केली आहे.

Web Title: Case filed against shops during lockdown in Ulhasnagar pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.