शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

सावधान..! परदेशातून येणाऱ्या कॉलचा ‘हॅलो’ मोठी किंमत वसूल करु शकतो.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 17:16 IST

गेल्या काही दिवसांपासून मोबाईलवर आफ्रिका, अमेरिका याबरोबरच काही आखाती देशांमधून मोबाईलवर फोन येण्याचे प्रमाण वाढले आहे...

ठळक मुद्देमोबाईलवर ट्रु कॉलर अँप डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला येणा-या फोनची कळते माहिती यात विशेष बाब म्हणजे चक्क लँडलाईनवर देखील अशा प्रकारचे फोनलाखोंच्या फसवणूकीला सामोरे जावे लागत असल्याच्या कित्येक घटना सायबर विभागाकडे दाखल नागरिकांनी जागरुक राहण्याची गरज

पुणे :  मोबाईलच्या पडद्यावर अमेरिका, थायलंड, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका या देशांच्या नावावरुन फोन आल्यास मनात एकीकडे कुतूहलाची भावना असली तरी दुस-या बाजुला या कुतुहलाची मोठी किंमत अनेकांना चुकवावी लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून मोबाईलवर आफ्रिका, अमेरिका याबरोबरच काही आखाती देशांमधून मोबाईलवर फोन येण्याचे प्रमाण वाढले आहे. यात विशेष बाब म्हणजे चक्क लँडलाईनवर देखील अशा प्रकारचे फोन आल्याने नागरिकांनी विशेषत: मोबाईलवर आलेल्या फोनला उत्तर न देणे शहाणपणाचे ठरणार आहे.  कझाकिस्तान, टांझानिया, येमेन, थायलंड, अमेरिका इतकेच नव्हे तर पाकिस्तानमधून मोबाईल वर फोन येण्याचे प्रमाण वाढल्याने अनेकांच्या मनात शंकेचे वातावरण तयार झाले आहे. मोबाईलवर ट्रु कॉलर अँप डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला येणा-या फोनची माहिती कळते. मात्र आता बाजारात हँकिंगच्या अद्यावत सॉफ्टवेअरमुळे हँकर्सचे काम सोपे झाले आहे. मोबाईल धारकाने मोबाईलवर ट्रु कॉलर डाऊनलोड केल्यानंतर आपल्याबद्द्लची माहिती इ मेलव्दारे  आपल्याला पाठविली जाते. मेल वर रोज शेकडोच्या संख्येने  ‘‘स्पँम’’च्या नावाखाली फसविणारे मेल येतात. या मेलला उत्तर दिल्यानंतर फोन येणे, किंवा मेलव्दारेच चॅटिंग करुन फसवणूक केली जाते. अनेकजण आपल्याला परदेशातून फोन येतो आहे या उत्साहातून तो फोन घेऊन आपल्याबद्द्लची सर्व माहिती फोन करणा-या व्यक्तीला दिल्याने त्यांना हजारो,लाखोंच्या फसवणूकीला सामोरे जावे लागत असल्याच्या कित्येक घटना सायबर विभागाकडे दाखल होत आहेत. याविषयी अधिक माहिती देताना आयटीक्षेत्रात काम करणारे व सायबर अभ्यासक अनुप कवठाई यांनी सांगितले की, किमान सात ते आठ वर्षांपासून नायजेरिया देशांतून मोठ्या प्रमाणावर कॉल येत होते. या देशांमधील काही हँकर्स इतर देशांमधील लोकांना फोन करुन त्यांची फसवणूक करत असे. आता तर अँन्ड्रॉइड फोन मुळे हँकिंग करणे सोपे झाले आहे. ही सिस्टीम सहजासहजी ब्रेक करता येते. यावर उपलब्ध असलेल्या शेकडो अँपकरिता मेल आयडीचा अँक्सेस घेतला जातो. वाढत्या आणि बदलत्या टेक्नॉलोजीमुळे जगातून कुठेही, कुणाला फोन करता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे आपल्याला नायजेरिया किंवा तझाकिस्तान मधून फोन येतो आहे असे ट्रु कॉलरच्या मदतीने समजले तरी प्रत्यक्षातून कॉल भारतातील एखाद्या राज्यातून केला गेलेला आहे. याचा माहिती आपल्याकडे नसते. मात्र कुठल्याही स्वरुपात या कॉलला उत्तर देता कामा नये. उत्तर देण्याच्या निमित्ताने फसवणूकीचे प्रमाण वाढत चालले दिसून येते. 

*  तो फोन घेऊच नका..आपल्याला येणारा फोन हा फसवणूकीचा आहे असे कळल्यावर त्याला उत्तर न देणे हे शहाणपणाचे आहे. अनेकदा ज्येष्ठांबरोबर तरुण देखील फोन वरुन देण्यात येणा-या माहितीच्या अमिषाला बळी पडतात. त्यामुळे त्यांची लाखोची फसवणूक होते. सध्या इंटरनेटच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बनावट सॉफ्टवेअर बाजारात उपलब्ध आहेत ज्यामुळे भारतातून फोन करुन तो फोन अमेरिकेतून आल्याचे भासविण्यात येते. मात्र आपल्या मोबाईलच्या पडद्यावर जर दिसत अमेरिकेवरुन फोन आला आहे हे दिसत असताना संबंधित व्यक्ती तो फोन का उचलते हा प्रश्न आहे. सध्या सोशल मीडीया आणि बनावट फोनच्या माध्यमातून फसवणूकीचे प्रमाण वाढले असून त्याविषयी नागरिकांनी जागरुक राहण्याची गरज आहे. - जयराम पायगुडे (पोलिस निरीक्षक सायबर सेल) ............... 

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसfraudधोकेबाजी