car over takes Two-wheeler on highway; bikers broke car | दुचाकीला कट मारला; तरुणांनी फोडली कार
दुचाकीला कट मारला; तरुणांनी फोडली कार

औरंगाबाद : कट मारून दुचाकी रस्त्यावर पडल्यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी कारच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना गुरुवारी दुपारी सव्वातीन ते साडेतीनच्या सुमारास जालना रोडवरील अग्रसेन महाराज चौकाजवळ घडली. याविषयी दुचाकीचालकाविरोधात सिडको ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.

पवन प्रकाश सदाशिवे (रा. अरिहंतनगर) हे त्यांचे मित्र कुणाल चौधरीसह सेव्हन हिलकडून जळगाव टी पॉइंटकडे कारने (क्रमांक एमएच-१४ बीएक्स ८७३१) जात होते.  त्यांच्या कारचा दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून दुचाकीस्वार तीन आणि  कारचालक यांच्यात तू तू मैं मैं झाली.  यानंतर कार थांबवताच संतप्त दुचाकीचालकासह त्याच्या साथीदाराने रस्त्यावरील दगड उचलून आणि काठी कारवर मारून कारच्या काचा फोडल्या.

Web Title: car over takes Two-wheeler on highway; bikers broke car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.